रत्नागिरी : निवडणूक मग ती कोणतीही असो. यावेळी महत्त्व असते ते निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हाला. प्रत्येक उमेदवार पक्षाचं चिन्ह नसेल तर आपल्या पसंतीचं चिन्ह मिळावं यासाठी धडपडत असतो. अनेक वेळा काही मजेशीर चिन्हं चर्चेचा विषय देखील ठरतात. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत देखील अशाच प्रकारे सध्या चिन्हांबाबत चर्चा होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे अगदी पाव, ब्रेड, सफरचंद, भाज्या, नेलकटर, कंगवा अशा एक ना अनेक मजेशीर चिन्हांचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 190 चिन्हं निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या या निवडणुकीपेक्षा चिन्हांचीच चर्चा जोरात होताना दिसत आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, 3921 जागांसाठी 7203 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. 4 जानेवारीपर्यंत उमेदवाराला आपला अर्ज मागे घेता येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या चिन्हांच्या यादीपैकी 190 निवडणूक चिन्हांचा पर्याय उमेदवारासमोर असून यामधून उमेदवाराला आपलं आवडीचं चिन्हं निवडावं लागणार आहे. ही सारी बाब लक्षात घेता आता कुणाला कोणतं चिन्हं मिळणार किंवा कोण कोणतं चिन्हं घेत प्रचार करणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. पण, सध्या नाक्यानाक्यांवर याचाची चर्चा रंगली आहे.


Gram Panchayat Election : ग्रामपंचायत सरपंचपदाच्या लिलावावर अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...


कोणत्या चिन्हांचा उमेदवारांसमोर पर्याय?
निवडणूक आयोगाकडून 190 चिन्हांची यादी जाहीर करण्याच आली आहे. यामध्ये सफरचंद, हिरवी मिरची, आले, फुलकोबी, ढोवळी मिरची, मका, आक्रोड, कलिंगड, संगणक, पेन ड्राईव्ह, माऊस, फोन चार्जर, स्वीच बोर्ड, पाव, ब्रेड टोस्टर, नेलकटर, ऑटोशिक्षा, फुगा, बॅट, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चष्मा, हॉकी, किटली, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, पांगुळगाडा, टोपली, विहीर, सीटी, चमचा, अननस, दातांचा ब्रेश, पेस्ट आदी 190 चिन्हांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान यापैकी चिन्हं निवडताना उमेदवाराला पाच चिन्हं प्राधान्यक्रमानं दिली आहेत. त्यापैकी एक चिन्ह उमेदवाराला निवडावं लागणार आहे.


Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स


कोण मारणार बाजी?
रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी सध्या आमदार, खासदार, जिल्हापरिषद आणि सर्वात जास्त जिल्हा परिषदांवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यानं जिल्ह्यातील निवडणुकांकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजप स्वबळावर लढणार असून अगदीच नगण्य ताकद असलेल्या भाजपला ग्रामीण भागातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे.


आमदार निलेश लंकेंची भन्नाट आयडिया, पारनेरमधील 30 ग्रामपंचायती बिनविरोध


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.