एक्स्प्लोर
Advertisement
आता एक्स्प्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. वाढत्या अपघातांवर मात करण्यासाठी सरकारने नवी शक्कल लढवली आहे. एक्सप्रेस वेवर लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग आणि ओव्हरटेकमुळे अपघातांचं प्रमान वाढत आहे. त्यामुळे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेबाबत आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, अजित पवार आणि एक्सप्रेस वे परिसरातील आमदार उपस्थित होते.
ड्रंक आणि ड्राईव्ह रोखण्यासाठी विशेष मोहीम
एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी 100 जणांची विशेष तुकडी तत्काळ नियुक्त करून त्यांना स्पेशल पोलीस फोर्सचा (SPO) दर्जा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्यात ड्रंक अँन्ड ड्राईव्हच्या केसेस वाढतात. ज्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत. यावर जरब बसवण्यासाठी पावसाळ्यात फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवण्याची सूचना एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement