मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिलपासून खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा एसबीआयने पुनर्विचार करावा, अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे.

https://twitter.com/ANI_news/status/838726464702836739

1 एप्रिलपासून खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याची मर्यादा एसबीआयने घातली आहे. मेट्रो शहरातील खातेधारकांना कमीत कमी 5 हजार रुपये, शहरी भागात 3 हजार रुपये, निम्नशहरी भागात 2 हजार रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात कमीत कमी 1 हजार रुपये ठेवावे लागतील, असा निर्णय एसबीआयने घेतला आहे.

अट पूर्ण न केल्यास कमीत कमी रकमेच्या मर्यादेनुसार यावर दंड आकारला जाईल. उदाहरणार्थ मेट्रो शहरातील खातेधारकाच्या खात्यात ठरलेल्या मर्यादेनुसार 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम असेल, तर त्यावर 100 रुपये दंड आणि सेवा कर आकारला जाईल. तर रक्कम 75 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर 75 रुपये दंड आणि सेवा कर आकारला जाईल.

''एटीएम व्यवहारांवरील मर्यादेचा पुनर्विचार करावा''

बँकांतील रोखीचे व्यवहार आणि एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास त्यावर ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे. या निर्णयाचाही पुनर्विचार करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सर्व बँकांना केली आहे.

https://twitter.com/ANI_news/status/838726464702836739

कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खाजगी बँकांनी बँक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 4 पेक्षा जास्त वेळा होणाऱ्या बँक व्यवहारांवर (बँकेत जाऊन केलेल्या व्यवहारांवर) प्रत्येकी 150 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. 1 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.  हा नियम 1 मार्चपासून सेव्हिंग आणि सॅलरी अकाउंटवर लागू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

ATM धारकांनो घाबरु नका, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं!


चारपेक्षा जास्त बँक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क!


HDFC चा दणका, ATM मधून पाचव्यांदा पैसे काढताना 150 रुपये फी