पंकजांची ऑडिओ क्लीप मोडून तोडून दाखवलीः गोविंद केंद्रे
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 07:24 PM (IST)
अहमदनगरः पंकजा मुंडे यांची व्हायरल क्लीप तोडून मोडून दाखवण्यात आली असून मुख्यमंत्र्यांना या क्लीपच्या चौकशीच्या मागणीसाठी पत्र लिहिलंय, असा दावा पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी केला आहे.
दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे, राजकीय भाषण करणार नाही, तर सामाजिक संदेश देणार असल्याचंही गोविंद केंद्रे यांनी म्हटलंय. त्यामुळे गोविंद केंद्रे यांच्या या मागणीनंतर आता या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. या कथित क्लीपमध्ये पंकजांनी नामदेव शास्त्रींविरोधात कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मात्र आमदार केंद्रे यांनी पंकजांचं समर्थन करत ही क्लीप मोडून तोडून दाखवली असल्याचं म्हटलं आहे. संबंधित बातम्याः