जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून भगवान गडावरील सुरक्षेचा आढावा
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 05:46 PM (IST)
अहमदनगरः भगवान गड दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भगवान गडाला भेट दिली. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गडावरील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गडावर सुरक्षेसाठी 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
यावेळी दोघांनीही भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींशी चर्चा करुन सुरक्षेचा आढावा घेतला. तसंच यावेळी हेलिपॅडच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. दरम्यान दसरा मेळाव्याला आणि पंकजा मुडेंच्या भाषणाला महंत नामदेव शास्त्रींचा विरोध कायम आहे.
एकिक़डे भगवान गडावर दसरा मेळाव्याची तयारी पंकजा मुंडे समर्थकांनी सुरु केली आहे. भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या आगमनासाठी हेलिपॅडही बनविण्यात आला आहे. त्यामुळे पंकजांचं भाषण आणि नामदेव शास्त्रींच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलंय. संबंधित बातम्याः