औरंगाबादः मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय मराठा मोर्चा संयोजकांनी घेतला आहे. मात्र 14 डिसेंबरला नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला नाही तर मुंबईत मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती मराठा मोर्चा संयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली.

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चा संयोजकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी 32 जिल्ह्यातील 11 प्रतिनिधी आले होते. बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांविषयी एकूण 11 निर्णय घेण्यात आले.

बैठकीत काय झालं?

औरंगाबादच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, सहा महिन्यात कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह एकूण 11 मागण्या करण्यात आल्या.