Governor Bhagat Singh Koshyari Letter : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह  कोश्यारींनी आक्षेप घेतला आहे. 


राज्यपालांचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रातून राज्यपालांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालोय. तसेच पत्रात जी मुदत देण्यात आली होती, त्यावरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच "माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणणं योग्य नाही. तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही.", असंही राज्यपाल म्हणाले आहेत. 


पाहा व्हिडीओ : CM Uddhav Thackeray यांनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांची तीव्र नाराजी; 'ते' पत्र माझाच्या हाती



मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हटलं होतं? 


कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्रातून उत्तर दिलं होतं. 'विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही? हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत सरकार निवडणूक घेण्याबाबत आग्रही भूमिका मांडली पत्रातून मांडली होती.


मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणीदेखील या पत्रातून केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :