एक्स्प्लोर

घनकचरा : सरकारला जाग, दंडाच्या तरतुदीचा बडगा

रस्त्यावर कचरा, धूळ टाकून घाण केल्यास 180 रुपये, रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी केल्यास 200 रुपये, उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

उस्मानाबाद : घनकचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधील नवीन बांधकामांना बंदी आणल्यानंतर, राज्य सरकारला जाग आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सरकारने आता दंडाच्या तरतुदीच बडगा उगारला आहे. ‘अ’ ते ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यावर कचरा, धूळ टाकून घाण केल्यास 180 रुपये, रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी केल्यास 200 रुपये, उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्ती, संस्था, दवाखाने, चित्रपटगृह, हॉटेल इत्यादी कुणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास जाग्यावर दंड आकारले जाईल. दंडाच्या या तरतुदीच्या निर्णयाची आजपासून तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नव्या बंधकामांवरील बंदी तूर्तास उठवली महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरील बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी हा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. मात्र त्यानंतर खडबडून जागं झालेल्या फडणवीस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू योग्यरीतीनं मांडण्याचे आदेश आपल्या वकिलांना दिले होते. त्यानुसार राज्याच्या वकिलांनी कोर्टापुढे आपली बाजू मांडली. घनकचरा व्यवस्थापनाबद्दल आपलं निश्चित धोरण हे गेल्यावर्षीच तयार झालं असून त्याची अंमलबजावणीही सुरू झालीय. गेल्या सुनावणीच्या वेळी हजर असलेले वकील योग्य माहिती उपलब्ध नसल्यानं वास्तविक परिस्थिती कोर्टापुढे मांडू शकले नाहीत, असं स्पष्टीकरणही सर्वोच्च न्यायालयापुढे देण्यात आलं. या मुद्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह उत्तराखंड राज्यावरील बंदी तूर्तास उठवलीय. यासंदर्भातील याचिकेवर 10 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. डेंग्यूमुळे दिल्लीत एका सात वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात सुमोटो अंतर्गत जनहित याचिका दाखल करूम घेतली होती. वारंवार निर्देश देऊनही देशातील अनेक राज्य घनकचरा व्यवस्थापना संदर्भात दिलेले निर्देश गांभीर्यानं घेत नसल्याचं यावेळी न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आलं. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र, उत्तराखंड, चंदीगढ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह काही केंद्रशासित प्रदेशांतील नव्या बांधकामांवर बंदी घालत आर्थिक दंडही ठोठावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
Embed widget