एक्स्प्लोर

शासकीय मदतीचा चेक 3 वेळा बाऊन्स, बँकेचा लाभार्थ्यालाच दंड

यवतमाळमध्ये 14 डिसेंबर रोजी कार्यक्रम घेऊन ही शासकीय मदत वितरित करण्यात आली.

यवतमाळ : सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून अपघातग्रस्तांना केलेल्या शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स झाल्याने लाभार्थ्यालाच बँकेने दंड ठोठावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही घटना आहे. यवतमाळमध्ये 14 डिसेंबर रोजी कार्यक्रम घेऊन ही शासकीय मदत वितरित करण्यात आली. लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले होते. मात्र धनादेश घेऊन गेल्यावर संबंधित खात्यात पुरेसे पैसेच नाही, या कारणाने शासकीय मदतीचा धनादेश अनादरीत झाला. यवतमाळच्या गौतमनगरात राहणाऱ्या सपना इंगळे या महिलेचे पती दीपक इंगळे यांचा 14 मार्च 2017 रोजी विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा हा धनादेश घेऊन सपना इंगळे तीन वेळा स्टेट बँकेत गेल्या. मात्र तिन्ही वेळा चेक बाऊन्स झाला. धनादेशही बाऊन्स होतो, हे पाहून गरीब लाभार्थी महिला संभ्रमात पडली आहे . त्यावरही बँकेने चेक देणाऱ्याऐवजी लाभार्थ्यावरच दंड आकारला. या संदर्भात यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना विचारणा केली असता याबाबत तपास आणि चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. लोकांच्या घरी घरकाम करून सपना आता दोन मुलं आणि सासऱ्यांचा सांभाळ करतात. मात्र या सरकारकडून मिळालेल्या मदतीसाठी मात्र त्यांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget