पंढरपूर : येत्या सोमवारी कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रिवर बंदी घातली जाते. परंतु कार्तिकी यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या दिवशी, त्याच्या अगोदरच्या आणि नंतरच्या एक दिवसासाठी म्हणजेच तीन दिवस (दशमी, एकादशी आणि द्वादशी) पंढरपूरात मद्य व मांस विक्रिवर बंदी घातली जाते. परंतु यंदा जिल्हा प्रशासनाने 18 नोव्हेंबर रोजी (एकादशीच्या आदल्या दिवशी) केवळ एक दिवस मद्य व मांस विक्रिवर बंदी घातली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. परंतु या प्रकरणाने जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे.