एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रब्बी बियाणांच्या खरेदीसाठी हजार-पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारणार

मुंबई : चलनतुटवड्याने हैराण झालेल्या ग्राहकांना सरकारने तूर्तास दिलासा दिला आहे. रब्बी हंगामाच्या बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकरी एक हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरु शकतात असा निर्वाळाही सरकारने दिला आहे. करंट अकाऊंट, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टसाठी आठवड्यातून आता 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. उलाढालीच्या सोयीसाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नोटबंदीनंतर 25 हजार रुपयेच काढण्याची मुभा होती, मात्र आता दुपटीने वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता ती वाढवून 50 हजारांवर नेण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर इतर महत्त्वाचे निर्णय :

1. दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा बदलता येणार दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच बदलता येणार. याचा अर्थ दोन हजारापेक्षा जास्त रकमेच्या हजार-पाचशेच्या नोटा तुमच्याकडे असतील, तर त्या वाया जाणार असा होत नाही. तुम्ही हे पैसे बँकेत तुमच्या खात्यावर जमा करु शकता. त्यानंतर सोयीनुसार एटीएममधून ही रक्कम काढू शकता. वारंवार येणारे ग्राहक टाळण्यासाठी बोटाला शाई लावणार. 2. साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग असल्याचं निरीक्षण अर्थमंत्री अरुण जेटलींनी नोंदवलं. काळा पैसा पांढरा केला जात होता, त्यामुळे गरजूंना पैसे मिळत नव्हते आणि बँकांसमोरील रांगाही कमी होत नव्हत्या. मात्र नवीन व्यवस्थेमुळे याला चाप बसण्याची आशा आहे. 3. लग्नघरांना सरकारचा दिलासा ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार आहे. मात्र यासाठी लग्नपत्रिका आणि स्वयंघोषणापत्र दाखवणं गरजेचं आहे. तसंच घरातील केवळ एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. 4.  पेट्रोल पंपांवरही पैसे काढता येणार देशातील काही पेट्रोल पंपावर 2 हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. 5. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत बंद 24 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावनाEknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदेEknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदेEknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
Embed widget