मुंबई :   शरद पवारांमुळे (Sharad Pawar) राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी  कॅन्सर झाला आहे.  छत्रपती शिवाजी महाजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) दिलेली तेजाची झळाली शरद पवारांमुळे हरवली आहे, अशी  टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.  तसेच  शरद  पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? असा सवाल देखील पडळकर यांनी केला आहे.


गोपीचंद पडळकर म्हणाले,  शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. 50-60 वर्षे आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळं हरवली . पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?



पडळकर म्हणाले,   मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आहे. शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी  कॅन्सर झाला.  छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षीत असणारा महाराष्ट्र जो 18 पगड जातींचा आणि 12 बलुतेदारांचा तो 50 वर्ष पवारांनी स्वत:ची  प्रायव्हेट कंपनी म्हणून वापरल. आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी असा झाला आहे. 


आता तुम्ही हरीनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात...., पडळकरांची पातळी सोडून टीका


जातीजातीमध्ये वाद लावायचा, महाराष्ट्रात वातावरण अशांत ठेवायचं आण प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम पवारांनी केले आहे. याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी 2014 साली परिवर्तन केला. पवारांचा जो शासनकाळ होता तो काळाकुट्ट होता. शरद पवारांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडण लावली. आता मला त्यांनी विनंती करायची आहे की,  निवांत राहा , हरीनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल, असेही पडळकर म्हणाले.



हे ही वाचा :


शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?