एक्स्प्लोर

संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar : पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील,

Gopichand Padalkar : भाजप नेते गोपीचंद पडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बोलताना भडक प्रतिक्रिया दिली आहे. मागील दोन वर्षापासून संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. 

दीड दमडीच्या पगारावर आपण किती बोलावं? महाराष्ट्राला किती उपदेश करावेत? संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. शिवसेनेनं एक बैठक घेऊन यांना रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी, असेही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकारांच्या यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांची हीच ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेला आहे. हे कोणत्या आंदोलन कधी गेले ? पगार पुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं, असा घणाघात पडळकर यांनी केलाय. 
एसटी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते परिवहन विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो. पण तसा प्रस्ताव आला नव्हता. 

अनिल परब हे टेबला खालचं मांजर आहे – सदाभाऊ खोत 
एसटी आंदोलनाची बाजू घेत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अजूनही आम्हाला निमंत्रण दिले नाही.  अनिल परब हे टेबलाखालचं मांजर आहे. त्यामुळे ते फार काही चांगला निर्णय कामगारांच्या बाजूने घेतील असं मला वाटत नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. जे सरकार आधीपासूनच बदनाम आहे. त्याला काय बदनाम करु.  काळ्या तोंडाला कोणी काळ फासत का ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. 

संजय राऊत काय म्हणाले होते?
एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले. कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget