Konkan Kanya Superfast Express : कोकण रेल्वेने (Konkan Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) आता सुपरफास्ट झाली आहे. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळपत्रक आणि गाडीच्या क्रमांकामध्ये बदल केला आहे. काल म्हणजेच 20 सप्टेंबरपासून हा बदल लागू झाला आहे.


कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांक बदलला
रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेसचा आता सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाला आहे.  20 सप्टेंबरपासून मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. याशिवाय कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांकही बदलला आहे. प्रचलित असलेल्या 0112  आणि 10111 या क्रमांकाऐवजी 20112 आणि 20111 या क्रमांकासह धावणार आहे. या गाडीतून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर आणि वेगवान होणार आहे.




सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसचं वेळापत्रक बदललं
सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. मुंबईहून मडगावसाठी निघणारी 20111 ही  कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून रात्री 11.05 वाजता सुटेल. त्यानंतर ही गाडी दादर (11.17), ठाणे (11.45 ), पनवेल (12.25), खेड (3.04), चिपळूण (3.30), संगमेश्वर रोड (4.02), रत्नागिरी (4.45), विलवडे (5.34), राजापूर रोड (5.50), वैभववाडी (6.10), कणकवली (6.42), सिंधुदुर्ग (7), कुडाळ (7.12), सावंतवाडी रोड (7.32), पेडणे (7.56), थिविम (8.10), करमाळी (8.32) आणि मडगाव जंक्शन (9.46 वाजता) इथे पोहोचेल.




तर मडगावहून मुंबईकडे निघणारी 20221 ही गाडी मडगावहून संध्याकाळी 7 वाजता सुटेल. ही गाडी करमाळी (7.40), थिविम (8), पेडणे (8.12), सावंतवाडी रोड (8.36), कुडाळ (8.58), सिंधुदुर्ग (9.12), कणकवली (9.28), वैभववाडी (9.54), राजापूर रोड (10.14), विलवडे (10.28), रत्नागिरी (11.15), संगमेश्वर रोड (11.55), चिपळूण (12.28), खेड (12.55), पनवेल (3.55), ठाणे (4.42), दादर (5.12) आणि सीएसएमटी (5.40 वाजता) स्थानकात पोहोचेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या