गोंदिया : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील गोंदिया हे मोठं रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तू आणि पैशावर डल्ला मारतात. याला आळा बसवा म्हणून रेल्वे सुरक्षा दल चोरट्यांवर नजर ठेवून असते. अशाच एका पाकिटमाराला रेल्वे पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडले. अटक केलेल्या आरोपीवर चोरी, हत्या, असे गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पहाडसिंग अहिवार, असं त्याच नाव आहे.


गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज शेकडो रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा या ठिकाणी होत असते. याचाच फायदा घेत काही भुरट्या चोरांनी याला आपला अड्डा बनवला होता. या चोऱ्या थांबाव्यात म्हणून रेल्वे पोलिस दल नेहमीच तत्पर असते. पोलीसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक चोरटा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दित जावून प्रवाशांजवळील पाकिट व नगदी चोरून पसार होत असल्याने दिसून आले.

पाकिटमार आंतरराज्यीय टोळीत सक्रिय -
आरोपी पहाडसिंह रात्रीच्यावेळी फलाट क्र. तीन व चारवर येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी बनून रेल्वेतून उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत जावून त्यांचे पर्स व नगदी रुपये मारून गोंदियातील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात जमा करुन पुन्हा रेल्वे स्थानकात आला. त्यानंतर तो आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये पर्स चोरून दुसऱ्या बोगीमध्ये जावून बसून नागपूरपर्यंत गेला. रेल्वे पोलीसही त्याच्या मागावर होतेच. पहाडसिंह हा रेल्वेगाडी नागपूरला पोहचल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाची पर्स चोरून बाहेर निघत असताना पोलिसांनी त्याची मोबाईलद्वारे शुटींग करीत त्याचा पाठलाग केला. तो रेल्वे स्थानकाबाहेर निघत असताना रेल्वे सुरक्षा दलाने त्याला पकडून गोंदियात आणले. त्याची चौकशी केल्यानंतर ह्याअगोदरही पहाडसिंहने अनेक चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. ऐवढेच नाही तर त्याच्यावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचाही गुन्हा आहे. रेल्वे सुरक्षा दलाने त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. यामागे मोठी आंतरराज्यीय टोळी असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.

CCTV | धक्कादायक! धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढून महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न | ABP Majha