एक्स्प्लोर

... अन्यथा गोंदियाचंही सुकमा झालं असतं!

गोंदिया : नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पुरून ठेवलेला स्फोटक पदार्थ जप्त करण्यात गोंदिया पोलिसांना यश आल्याने मोठी दुर्घटना टाळली. विशेष म्हणजे आजपर्यंत गोंदिया जिल्यात नक्षलवाद्यांनी कधीही न वापरलेला टायमर बॉम्ब पहिल्यांदाच वापरण्याचं कारस्थान पोलिसांनी उधळून लावलं. छत्तीसगढ राज्याच्या सुकमा जिल्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात 25 जवान शाहीद झाले आहेत. तर अनेक जवानांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलमच्या नक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यातील किशोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारनोली-बोरटोला गावच्या रस्त्यात नक्षली पत्रक लावून ठेवलं. बोरटोला गावातील पोलीस पाटलांनी याची माहिती गोंदिया पोलिसांना दिली. पोलिसांचं एक पथक नक्षलवाद्यांनी लावलेला बॅनर काढण्यासाठी गेलं. मात्र बॅनरपासून 12 फूट अंतरावर नक्षलवाद्यांनी स्फोटकं पेरून ठेवल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला याची तात्काळ माहिती दिली. पथकाने बॅनरपासून 30 फूट अंतरावर तीन ठिकाणी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटकं शोधून काढली. 4 किलो द्रव्य स्फोटक, दोन डिटोनेटर, एक बॅटरी, 500 फुटाच्यावर विजेचा तार, स्टीलचे ड्रम आणि आजपर्यंत आणि तीव्र शक्तीचा टायमर बॉम्ब जप्त करण्यात आला. याआधी देखाली नक्षलवाद्यांनी जिल्यात विविध ठिकाणी घातपात घडवून आणण्यासाठी अनेकदा स्फोटकं पेरून ठेवली. मात्र जप्त करण्यात आलेल्या स्फोटकातील टायमर बॉम्ब हा इतका शक्तीशाली आणि प्रोफेशनल मॅकेनिक पद्धतीने आयटी सेक्टरची मदत घेऊन तयार करण्यात आलेला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. सुकमा नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी संपूर्ण जिल्यात हायअलर्ट जारी केला आहे. जिल्यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी एखादी वस्तू संशयास्पदरित्या आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नक्षलवाद्यांनी बाबू व्यापारी आणि तेंदू पत्ता व्यापारी यांच्या, आणि पोलिसांकडून नक्षलविरोधी जनजागृती अभियान चालवण्यात येत असल्याचा विरोध गोंदिया जिल्याच्या बोरटोला गावात मिळालेल्या नक्षली पत्रकामध्ये पत्रकाद्वारे केला आहे. संबंधित बातम्या :

सुकमा हल्ला: गुप्तचर यंत्रणेची मोठी चूक?

5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी

सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?

छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Jalgaon Crime News: लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना
लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना
Gondia News: दुष्काळात तेरावा महिना! गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयाची पाळ फुटली; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, अनेक गावामध्येही शिरलं पाणी
दुष्काळात तेरावा महिना! गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयाची पाळ फुटली; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, अनेक गावामध्येही शिरलं पाणी

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
Embed widget