Gondia Gram Panchayat Election Results 2022: पूर्व विदर्भातील गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात चर्चेची ठरलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील (Arjuni-Morgaon Taluka) सासू आणि सूनेच्या लढतीत, सुनेने बाजू मारली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकाच कुटुंबातील सासू आणि सून सरपंच पदाकरिता निवडणूक रिंगणात आमने-सामने उभ्या होत्या. मतमोजणीनंतर निकाल हाती आले असून सून किरण मिलिंद ढवळे यांनी सासू मंदा योगिराज ढवळे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे सासू आणि सून दोघींनीही अपक्ष निवडणूक लढवली होती. 


1650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. 15 वर्षांनंतर या ग्राम पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी महिला सरपंचपद राखीव झाले होते. सरपंचपदी सून निवडून आल्यानं गावात उत्साहाचं वातावरण आहे. साधारणपणे घरात सासू आणि सूनेमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमीच बघण्यात येते. पण गावाची कारभारी बनण्यासाठी सासू-सूनेमध्ये थेट लढत झाली. गावात प्रभावी महिला किरण ढवळे यांची ओळख होतीच. गावातील स्थानिक नेत्यांनी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे त्यांना सरपंचपदासाठी निवडणुकीत उभे केले होते. 


ग्रामस्थांनी अनुभवली मालिकेच्या कथेला शोभेल अशी लढत


किरण मिलिंद ढवळे आपल्या चुलत सासू विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या होत्या. एका डेली सोपच्या मालिकेला शोभेल अशी लढत बोदरा देऊळगावमध्ये झाली. एकाच कुटुंबातील दोघे निवडणूकीत उभे असल्याने ग्रामस्थांचेही अंदाज दररोज बदलत होते. अखेर यामध्ये सूनेने बाजी मारली. ढवळे कुटुंबाचे नातेवाईक या निवडणुकीत पेचात पडले होते. नातेवाईकांनी कोणाच्याही प्रचारात सामील न होता. सावध पवित्रा घेतला होता. पण त्यांनी सुनेलाच साथ दिल्याचे सिद्ध झाले. दोघींनीही जोमात प्रचार केला होता. आपण निवडून आल्यास काय फायदा होईल, हे देखील दोघींनी गावकऱ्यांना पटवून देण्यास जोमाने प्रयत्न केले. ही निवडणूक पूर्ण पूर्व विदर्भात काँटे की टक्कर, अशीच झाली.


राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निकाल


राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक अठरा डिसेंबरला पार पडल्या. त्यानंतर आज मतमोजणी पडत आहे. (Gram Panchayat Election) त्या पार्श्वभूमीवरच नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) 236 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाली होती. त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते. आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात 98 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला तर 90 ग्राम पंचायती कॉंग्रेसने काबिज केल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे गटाला आठ ग्रामपंचायती मिळाल्या तर उद्धव ठाकरे गटाला केवळ दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खात्यात बावीस ग्रामपंचायती गेल्या तर अपक्ष आणि इतरांनी सोळा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.


नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रमुख लढती...



  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वडविरा या गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असून अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख हे दोन गट आमने-सामने होते.

  • कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या धानला गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असून तेथे त्यांचा भाजप विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे तापेश्वर वैद्य या दोन गटांमध्ये लढत होती.

  • सावनेर तालुक्यातील केळवद  ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसने 88 वर्ष सेवानिवृत्त शिक्षक यशवंत विंचुरकर यांना रिंगणात उतरवले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर