Maharashtra Gram Panchayat Election Result Updates : निवडणूक मग ती आमदार पदाची असो की, ग्रामपंचायतची, सर्वांसाठी ती प्रतिष्ठेची असते. घराघरांत जावा जावांमधील वाद सर्वश्रुत आहेत. अशाच काहीशा लढती यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही झाल्या आहेत. काही ठिकाणी काका-पुतण्या आमने-सामने आले, तर काही ठिकाणी जावा-जावांमध्ये लढत झाली. एवढंच नाहीतर या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गज नेतेमंडळींच्या कुटुंबियांनी गड राखला. तर काही ठिकाणी नावाजलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी बाजी मारली. अशाच हायप्रोफाईल उमेदवारांची यादी पाहुयात फक्त एका क्लिकवर... 


इंदोरीकर महाराजांची सासू सरपंच 


किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सासूबाई (Mother-in-Law) सरपंचपदी (Sarpanch) विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार (Shashikala Shivaji Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत (Nilwande Gram Panchayat) निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.


गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदी विराजमान 


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत, आणि पडळकरवाडी ग्रामपंचायतवर ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे,7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत,तर सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.या विजयानंतर आटपाडी मध्ये जल्लोष करण्यात आला आहे.


बच्चू कडू यांचे बंधू विजयी 


अमरावती जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे, बेलोरा ग्रामपंचायत. आमदार बच्चू कडू यांच्या गावी बेलोरा ग्रामपंचायतीवर प्रहारचा झेंडा फडकला आहे. बच्चू कडू यांचे बंधू भैयासाहेब कडू सरपंच पदाच्या निवडणुकीत 1234 मतांनी विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे दत्ता विधाते यांचा पराभव केला. बच्चू कडू यांच्यासाठी प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. बेलोरा ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या गटाचे 13 पैकी 13 सदस्य विजयी झाले आहेत.


गोंदियात सासू-सून लढत 


गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अतंर्गत येणारा बोदरा गावात सासुबाई विरुद्ध सुनबाई अशी निवडणूक झाली. यात सुनबाई किरन ढळवे यांनी सासूबाईंचा पराभ करत विजय मिळविला आहे. 


पैठणमध्ये ईश्वर चिठ्ठीची कमाल


पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी ग्राम पंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत समसमान मतं पडल्यानं लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी टाकण्यात आली. यात वंदना थोटे या विजयी झाल्या. छाया थोटे आणि वंदना थोटे यांना 164 - 164 समसमान मतं पडली होती. यात वंदना थोटे या नशीबवान ठरल्या आणि विजयी झाल्या. 


धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ सरपंच 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे संरपंचपदी विराजमान झाले आहेत. नाथरा ग्रामपंचायतीमधून अभय मुंडेल यांचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड राखल्याने धनंजय मुंडे यांनी आईचे आशीर्वाद घेतले. एवढंच नाहीतर, मै हूं डॉन गाण्यावर धनंजय मुंडेंनी ठेकाही धरला. 


नगर : थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपने खाते उघडले, संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत भाजपचा विजय, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांच वर्चस्व 


जळगाव : गुजरातचे  भाजपचे प्रदेशअध्यक्ष  सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलचां पराभव, भाविनी मात्र जिंकल्या, विरोधात असलेल्या भाजप कार्यकर्ते शरद पाटील यांच्या लोकशाही ग्राम उन्नती पॅनल विजयी 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Winner List : तुमच्या गावचा 'कारभारी' कोण? पाहा एका क्लिकवर