एक्स्प्लोर
गोंदियाच्या काँग्रेस आमदाराला भाजप नगरसेवकाकडून मारहाण

कोणालाही मारहाणीचा अधिकार नाही : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पक्षाकडून योग्य ती कारवाई, भाजप प्रवक्ते माधव भंडारींचं आश्वासन ही सत्तेची मस्ती, नगरसेवकाच्या हकालपट्टीची धनंजय मुंडेंची मागणी इतरांच्या मनात धास्ती भरवणारा नियोजित हल्ला, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंचा दावा कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर : विखे पाटील राज्यातील वैमनस्य वाढत चाललंय : शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे भाजप म्हणजे गुंडांची पार्टी, मारहाण करणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही : विलास मुत्तेमवार झालेला प्रकार तालिबानी, काँग्रेस नेते विलास मुत्तेमवारांची प्रतिक्रिया गोंदिया : गोंदियात काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे. गोंदियामध्ये हॉटेल द ग्रँड सीतामध्ये गोपाल अग्रवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा आणि त्यांचे साथीदार राहुल श्रीवास्तव तिथे आले आणि त्यांनी गोपाल अग्रवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा विशाल मध्ये पडला. त्यावेळी विशाललाही मारहाण झाली आहे. विशेष म्हणजे मारहाणीचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या मारहाणीनंतर शिव शर्मा फरार झाला आहे. गोंदिया नगर पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा विशाल मध्ये पडला. त्यावेळी विशाललाही मारहाण झाली आहे. विशेष म्हणजे मारहाणीचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या मारहाणीनंतर शिव शर्मा फरार झाला आहे. गोंदिया नगर पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पाहा फोटो :
गोंदियाच्या काँग्रेस आमदाराला भाजप नगरसेवकाकडून मारहाण
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















