Gold Silver Rate : अलीकडच्या काळात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही केल्या सोन्या चांदीच्या किंमती कमी होताना दिसत नाहीत. यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुद्ध चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे भाव 96 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर सोनं 79 हजार रुपयांवर गेलं आहे. 


पश्चिम आशिया खंडात सुरु असलेल्या युद्धाचा देखील सोनं चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे. तसेच जागतिक व फेडरल रिझर्व्ह  बँकांनी कमी केलेला व्याजदराचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या भावात तेजी बघायला मिळत आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे भाव 96 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले आहेत. सोन्याच्याही भावात तेजी बघायला मिळत आहे. चांदी 96 हजार रु प्रति किलो तर सोने 79 हजार रु. प्रति तोळा पोहचलं आहे. सोन्या चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांचं बजेट मात्र कोलमाडल्याचं काहीस चित्र बाजारपेठेत बघायला मिळत आहे. 


सणासुदीच्या काळात सोनं 80000 रुपयांवर जाणार


दरम्यान, येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळं सोनं 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


दरात वाढ होण्याचं कारण काय?


फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर लगेच दिसून येत आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळं अनेक संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक मोठा परतावा देते, त्यामुळं अनेकांचा सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा कल असतो. 


महत्वाच्याा बातम्या:


Gold Silver Rate : सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! मुंबईत लवकरच सोनं गाठणार 80000 चा टप्पा, तर चांदीही 94000 जवळ