मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा  44,760 रुपये इतका आहे. 


चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हा दर 65,700 इतका होता. 


गेल्या आठवड्याचा विचार करता केवळ बुधवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली होती. नाहीतर इतर दिवशी सातत्याने दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. गेल्या महिन्यात एक फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 49,450 इतका होता. 


मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 


अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 


महत्वाच्या बातम्या :