एक्स्प्लोर

'सुवर्णवेध' टिपणाऱ्या तेजस्विनीचं कोल्हापुरात जंगी स्वागत

गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली. तेजस्विनी आणि तिचे पती समीर दरेकर यांचं औक्षण करण्यात आलं.

पुणे/कोल्हापूर : ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा दोन पदकांची मानकरी ठरलेली नेमबाज तेजस्विनी सावंतचं कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली. तेजस्विनी आणि तिचे पती समीर दरेकर यांचं औक्षण करण्यात आलं. मग समीर दरेकर यांनी तेजस्विनीला मिठाई भरवून तिचं अभिनंदन केलं. त्यावेळी तेजस्विनीच्या आई सुनीता सावंतही उपस्थित होत्या. तेजस्विनीने आपल्या कुटुंबीयाच्या आणि चाहत्यांच्या साक्षीने दोन्ही पदकांसह फोटोला पोज दिली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं कौतुक केलं. कोल्हापूरच्या वर्षा नगर भागात फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या तेजस्विनीच्या आगमनाने कोल्हापुरात आनंदाचं वातावरण आहे. तेजस्विनीची चमकदार कारकीर्द तेजस्विनी सावंतच्या आजवरच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर तेजस्विनीनं 2006 आणि 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लूट केली होती. 2009 साली म्युनिचच्या विश्वचषकात ती 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशनच्या कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. मग 2010 साली ती म्युनिचमध्येच 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन झाली. अर्जुन पुरस्काराची मानकरी तेजस्विनी सावंतची 2006 ते 2010 या चार वर्षांमधली आंतरराष्ट्रीय कामगिरी खरोखरच कमालीची आहे. याच कामगिरीनं तिला 2011 साली केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कारही मिळवून दिला. त्यामुळं खरं तर यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विनीने मिळवलेल्या रुपेरी त्यानंतर सोनेरी यशाचं प्रथमदर्शनी आश्चर्य वाटणार नाही. पण तेजस्विनीचं आठ वर्षांनी वाढलेलं वय आणि तिची वैवाहिक जीवनातली वाढती व्यस्तता लक्षात घेतली, तर तिच्या कामगिरीला शाबासकी ही द्यावीच लागेल. तेजस्विनी आज 37 वर्षांची आहे. त्यामुळं अनेकांनी... झालं संपली हिचं करिअर म्हणून तिला निकालात काढलं होतं. लग्नानंतरही यशाची परंपरा तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांना आपल्या लेकीच्या कॉमनवेल्थ गेम्समधल्या पदकांची तशी सवय जुनी आहे. पण तेजस्विनीनं लग्नानंतरही यशाची परंपरा कायम राखली म्हणून त्यांना जास्त अभिमान आहे. संबंधित बातमी :

कोण म्हणतंय करिअर संपलं, तेजस्विनीने पुन्हा सोनं जिंकलं!

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget