Gokul Milk Rate Hike : वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या (Milk) दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. गोकुळने (Gokul) गायीच्या दुधामध्ये तीन रुपयांची वाढ केली आहे तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळचं दूध प्रतिलिटर 54 रुपयांवर पोहोचलं आहे. दरम्यान आजपासून दरवाढ लागू करण्यात आली आहे. 


या दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र नवीन दूध दरवाढीचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसणार आहे. गोकुळकडून ही दुधाची दरवाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तशी माध्यमात जाहिरात दिली आहे. दरम्यान गोकुळ ब्रँडच्या फुल क्रिम दुधाच्या दरात बदल करण्यात आलेला नाही.


गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली होती. गोकुळने 27 ऑक्टोबरला गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होती. मात्र विक्री दरात वाढ केली नव्हती. परंतु वाढीव दराने दूध खरेदी करुन जुन्या दराने विक्री करणं तोट्याचं ठरत असल्याने संचालक मंडळाने सोमवारी मध्यरात्री बारापासून विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. हा दर मुबंई, पुणे, मुबंई उपनगर, ठाणे, रायगड येथे लागू होणार आहे.


VIDEO : Gokul Milk Rate : गोकुळच्या दुधाच्या किंमतीत वाढ, गाईचं दूध 3 रुपयांनी वाढलं





दुधाचे प्रकार               जुने दर (प्रति लिटर) नवे दर (प्रति लिट)   नवे दर (प्रति युनिट)


गायीचं दूध (1 लिटर)                51 रुपये            54 रुपये            54 रुपये


गायीचं दूध (500 मिली)            52 रुपये            54 रुपये            27 रुपये


टोन्ड दूध ( 500 मिली)             50 रुपये            52 रुपये            26 रुपये


टोन्ड दूध (1 लिटर)                 50 रुपये            52 रुपये            52 रुपये


स्टॅण्डर्डाइज दूध (500 मिली)   52 रुपये            54 रुपये            27 रुपये