Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली आहे. अपघात झालेल्या घटनास्थळावर प्राधिकरणानं क्रॅश कुशन (Crash Cushion) बसवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी आता अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. 


उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला तीन महिने उलटल्यानंतर प्रशासनाला आता जाग आलीय. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी आता अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. अछाड ते घोडबंदरपर्यंत 29 ब्लॅक स्पॉट असून अशा ठिकाणी सिग्नल यंत्रना बसवणं, अनधिकृत कट बंद करण्यासोबतच क्रॅश कुशनही बसवण्यात आलं आहे. या महामार्गावर प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 


अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अछाड ते घोडबंदरपर्यंत जवळपास 29 ब्लॅकस्पॉट असून सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं सिग्नल यंत्रणा दोन लेनमध्ये अनधिकृत असलेले कट बंद करणं, त्याचप्रमाणे सूचना देणारे फलक अशा उपाययोजना करण्यात येत आहे. 


सायरस मिस्त्रींचा अपघात नेमका कसा झाला? 


प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा वयाच्या 54 व्या वर्षी अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत असताना हा अपघात झाला होता. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला होता. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली होती. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 


सायरस मिस्त्री यांचा महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात त्यांची कार डिव्हायडरला आदळली, तेव्हा हा अपघात झाला होता. कारमध्ये 4 लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. महिला कार चालवत होती. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश होता. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांच्या चौकशीनंतर महिला कार चालक डॉ अनाहिता पंडोल यांच्याविरोधात पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.