मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात, असताना खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकी चालकाची आस्थेने चौकशी केली. त्यानंतर अपघातग्रस्त दुचाकी चालकाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका मागवून त्यातून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यापूर्वी देखील दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून आवश्यक ती मदत उपलब्ध करुन दिली होती. त्यांच्या या कृतीचे सगळीकडून स्वागत केले जात आहे.