नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरु असलेल्या जेएनयूबाहेरील मोर्चात काल सहभागी झाली होती. त्यानंतर ट्विटरवर तिच्या समर्थनार्थ ट्वीटचा वर्षाव सुरु होता. मात्र दीपिका या मोर्चा गपचूप उभी होती आणि काहीही न बोलता तेथून निघून गेली. दीपिकाने जेएनयूच्या बाहेरील मोर्चात सहभागी असलेल्या जेएनयूची विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली. दीपिका पूर्णवेळ गप्प असल्याने आयशी घोषने म्हटलं की, एवढ्या मोठ्या उंचीवर असल्यावर तुम्ही बोलायला हवं होतं.
दीपिका जेएनयूबाहेर सुरु असलेल्या आंदोलनात पोहोचली आणि तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यावेळी कन्हैया कुमारचं भाषण त्याठिकाणी सुरु होतं. दीपिकाच्या उपस्थिती कन्हैयाने भाषण दिलं. विद्यार्थी आझादी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत होते. यादरम्यान दीपिका पूर्णवेळ शांत उभी होती. काही वेळाने दीपिका माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता आपल्या गाडीत बसून तेथून निघून गेली.
#ISupportDeepika विरुद्ध #boycottchhapaak
दीपिका जेएनयूबाहेरील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काल ट्विटरवर दीपिकाच्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेन्ड झाले होते. आताही दीपिकाच्या नावाने सुरु झालेला #ISupportDeepika हा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. मात्र दीपिकाच्या विरोधातही #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये होता.
जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही गुंडानी मुलींच्या वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष ही देखील जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करताना दिसत होत्या. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. याप्रकरणी अज्ञातांनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
संबंधित बातम्या
- JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती?
- #JNU Attack : अभिनेत्री दीपिका पादुकोण जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला; विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषची घेतली भेट
- JNU Attack | जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!
JNU Attack | जेएमयूमध्ये रक्तपात करणारे गुंड 48 तासांनंतरही मोकाट का? | स्पेशल रिपोर्ट