एक्स्प्लोर

सिंधुदुर्गात ‘ग्लास बॉटम बोट’, समुद्राखालचं सौंदर्य बोटीतूनच पाहा

समुद्र तळाशी असलेल्या सागरी सौंदर्याचा खजिना विविध प्रजातीचे मासे, शंख, शिंपले, प्रवाळ व कोरलग्लास बॉटम बोटमध्ये बसूनच पर्यटकांना पाहता येणार आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभी ही बोट पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणात सागरी पर्यटनाची भुरळ देशी विदेशी पर्यटकांना पडत आहे. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न येथील पर्यटन व्यावसायिकांकडून नेहमीच केला जातो. त्याच धर्तीवर ‘ग्लास बॉटम बोट’ ही अनोखी सागरी पर्यटन संकल्पना चिवला बीच वॉटर स्पोर्टस्चा माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी साकारली आहे. समुद्र तळाशी असलेल्या सागरी सौंदर्याचा खजिना विविध प्रजातीचे मासे, शंख, शिंपले, प्रवाळ व कोरलग्लास बॉटम बोटमध्ये बसूनच पर्यटकांना पाहता येणार आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभी ही बोट पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली. या बोटींबाबत माहिती देताना येथील पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर यांनी कोकण किनारपट्टीवरील ही पहिलीच बोट असल्याचा दावा केला आहे. सिंधुदुर्गात ‘ग्लास बॉटम बोट’, समुद्राखालचं सौंदर्य बोटीतूनच पाहा चिवला बीच येथील पिंटो रॉड्रिक्स या पर्यटन व्यावसायिक युवकाने पुढाकार घेऊन लाखो रुपये खर्चाची ही बोट मालवण चिवला किनारपट्टीवर आणली आहे. बोटीच्या तळाला काचा बसवण्यात आल्या आहेत. बोटीत बसून समुद्र सफर करत असताना काचेखालून समुद्री जगाचा आनंद लुटता येतो. गोवा राज्यासह परदेशी किनारपट्टीवर अशा प्रकारे ग्लास बॉटम बोट संकल्पना पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. चिवला बीच येथे पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्थानिकांनी पुढाकार घेत लाखो रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प राबवला असल्याची माहिती गोवेकर यांनी दिली. मालवणला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती स्कुबा डायव्हिंग असते, मात्र ऑक्सिजन सिलिंडर लावून समुद्रखाली स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटताना दहा वर्षांखालील मुले व वृद्ध यांना परवानगी दिली जात नाही. याचा विचार करता मुले व वृद्ध यांच्यासह ज्यांना पाण्यात उतरायची भीती असते अशा सर्वांना समुद्राखालील विश्व ग्लास बॉटम बोटच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. चिवला बीचवर सर्व प्रकारचे सागरी पर्यटन कोकण किनारपट्टीवरील चिवला बीच हा सर्वात सुरक्षित सागरी किनारा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढत आहे. चिवला बीच वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून स्कुबा, बोटिंग, पॅरासेलिंग व अन्य पर्यटन उपलब्ध आहे. लवकरच आंतराष्ट्रीय स्तरावर असणारे अन्य सागरी पर्यटनाची माध्यमे चिवला बीच येथे उपलब्ध करण्याचा मानस सचिन गोवेकर यांनी व्यक्त केला. तर शासनानेही सहकार्य करावे अशी अपेक्षाही गोवेकर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget