औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनींनी रात्री दहा वाजता कुलुगुरुंच्या घरासमोर ठिय्या मांडत हल्लाबोल आंदोलन केलं. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाण पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. मुलींच्या वसतिगृहात पाण्याचा थेंबही नाही.  त्यामुळेच जवळपास साडेतीनशे मुलींनी रात्री दहा वाजता कुलगुरुंच्या घरासमोर ठिय्या मांडला.


आठवडाभरापूर्वी अशाच पद्धतीने वसतीगृहातील समस्या सोडवण्याच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या दालनात अनोखे आंदोलन केले होते. आता मुलींनाही रस्त्यावर उतरावं लागलं आहे. कुलगुरू डॉ. बाळू चोपडे यांना विद्यापीठातून बाहेर काढा अशा घोषणा या विद्यार्थिनी देत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा वादग्रस्त कुलगुरू अडचणीत येण्याची शक्यता आहे.



संतप्त मुलींच्या आंदोलनामुळे विद्यापीठात रात्री एकच गोंधळ उडाला. विद्यापीठातील वसतिगृहात समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातच पाणी नसल्याने विद्यार्थिनींनी आक्रमक होत कुलगुरुंच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या सगळ्यासाठी कुलगुरू डॉ. बाळू चोपडे हे जबाबदार आहेत, त्यांना विद्यापीठातून बाहेर काढा आशा घोषणा या विद्यार्थिनी देत होत्या.   औरंगाबाद | मराठवाडा विद्यापीठात गोंधळ सुरुच, वसतिगृहात पाणी नसल्यानं विद्यर्थिनींचं आंदोलन

आठवडाभरापूर्वी विद्यार्थ्यांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आंदोलनामुळे चर्चेत आहे. आठवडाभरापूर्वी अभाविपने कुलगुरुंच्या दालनात आंदोलन केलं होतं.  चक्क कुलगुरुंच्या दालनात कुठे पंख्यावर टॉवेल वाळत घातले , तर कुठे टीव्हीवर चड्डी वाळत घातली. विद्यार्थी कुलगुरुंच्या दालनातच जेवायलाही बसले. ही सगळी परिस्थिती कुलगुरुंच्या दालनातील होती यावर विश्वास बसत नव्हता. अभाविपने या पद्धतीने आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या संशोधन वसतिगृहात अनेक विद्यार्थी बेकायदेशीरपणे राहतात, असा अभाविपचा आरोप आहे. वारंवार विद्यापीठ प्रशासनाला याबाबत माहिती दिली, मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही, म्हणून अशा पद्धतीने आंदोलन केलं, असा दावा अभाविपने केला.

संबंधित बातम्या