एक्स्प्लोर
लग्नाला नकार, प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या

वर्धा: लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंकज डिकूनवार उर्फ कुळसकर या आरोपली अटक केली आहे. मोठ्या भावाच्या मेहुणीसोबत पंकजचे प्रेमसंबंध होते. मात्र, याला त्या तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळं संतापलेला पंकज पहाटे साडेचारच्या सुमारास घरात घुसला आणि त्यानं चाकूनं वार करुन रेखा भांडेकर आणि पांडुरंग भांडेकर यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग यांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या नातेवाईक शांता कुसळकरही हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















