एक्स्प्लोर
'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'

जळगाव: मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरु असताना दारु कारखान्यांसाठी होत असलेल्या भरमसाठ पाणी पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. गिरीश महाजन आज जळगाव दौऱ्यावर असताना एबीपी माझाशी बोलत होते. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यात असलेल्या दारु कारखान्यांसाठी कोट्यवधी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जोवर पाऊस पडत नाही तोवर हा पाणीपुरवठा बंद केल्यास शेकडो गावं, वाड्यावस्त्यांची तहान भागेल असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. एका वर्षात मराठवाड्यात 27 कोटी लीटर बीअरचं उत्पादन होतं. एका लीटर बीअरसाठी 4 लिटर पाणी लागतं. आणि ही चैन दुष्काळात परवडण्यासारखी नाही. त्यामुळं सध्या दारुकंपन्यांना होत असलेला पाणीपुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी जोर धरतेय. दरम्यान जोवर पाऊस पडत नाही, तोवर म्हणजेच पुढचे दोन महिने दारुच्या कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा तातडीनं बंद करायला पाहिजे अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















