जळगाव : ठाकरे गटाचा (Thackeray Group) मोठा नेता बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून मोठं वक्तव्य करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये (BJP)  प्रवेश करणार असल्याचे महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अनेकजण भाजपमध्ये येण्याची शक्यता शक्यता देखील महाजन यांनी व्यक्त केली आहे. 


येणाऱ्या काही दिवसात इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. विरोधी पक्षात कोणी राहायला तयार नाही, त्यांच्या राज्यातील, देशातील नेतृत्वावर कोणाचा विश्वास राहिला नसल्याने अनेकजण मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत आमच्या आणि आमच्या मित्र पक्षात अनेकजण येतील. आमच्या मित्र पक्षात कोणतीही नाराजी नाही, लवकरच सगळ्या मित्र पक्षांना सोबतघेऊन आम्ही मेळावे घेणार आहोत. कुठेही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. कोणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला थारा दिला जाणार नाही, असे महाजन म्हणाले आहेत.


खडसे परिवाराला विरोध...


दरम्यान रक्षा खडसे यांना भाजप कार्यकर्त्यांच्या विरोध होत असल्याच्या प्रश्नावर बोलतांना महाजन म्हणाले की, “मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा खडसे परिवाराला विरोध आहे. त्यातून काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्या विषयावर आता पडदा पडला असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.


महाविकास आघाडीसह विरोधकांचा पूर्ण बारा वाजले आहे : महाजन 


आमच्या रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघात आम्ही राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा आमचा संकल्प आहे. महविकस आघाडीसह विरोधकांचा पूर्ण बारा वाजले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहे, तेही फार काळ सोबत राहणार नाही. लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे त्यांनी कितीही आघाड्या केल्या तरी मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही, असेही महाजन म्हणाले. 


पुन्हा फोडाफोडीचे राजकारण? 


निवडणुका तोंडावर आल्या की राजकीय पक्षातील फोडाफोडीचे राजकारण मागील काही वर्षात एक समीकरण बनले आहेत. मनासारखी उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची देखील संख्या वाढत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत असेच काही पक्षप्रवेश देखील चर्चेचा विषय ठरले. विशेष म्हणजे पुढील काही दिवसांत देखील मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : चांगल्या उमेदवाराला पाठींबा मग तो कोणत्याही पक्षाचा असो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM ची मोठी घोषणा