एक्स्प्लोर
गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना

मनमाड : गेल्या 20 वर्षांपासून धावणाऱ्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये सालाबादप्रमाणे यंदा गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रवासी संघटनेतर्फे श्री गणेशाची विधीवत स्थापना करण्यात आली. गोदावरी एक्सप्रेसने रोज चाकरमानी रोज मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करत असतात. पासधारकांच्या याच बोगीत गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशाची मोठ्या भक्तीभावाने आरती करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजराने रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून गेला होता.
दर वर्षी वेगवेगळे सामाजिक संदेशाचे पोस्टर संपूर्ण गाडीमध्ये लावून समाजप्रबोधनाचे काम हे मंडळ करत असतं. गाडीची वेळ होताच गोदावरी एक्सप्रेस स्टेशनवरुन मार्गस्थ होते आणि प्रवाशांबरोबरच गणपती बाप्पाचा दहा दिवस प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशी गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातात.
दर वर्षी वेगवेगळे सामाजिक संदेशाचे पोस्टर संपूर्ण गाडीमध्ये लावून समाजप्रबोधनाचे काम हे मंडळ करत असतं. गाडीची वेळ होताच गोदावरी एक्सप्रेस स्टेशनवरुन मार्गस्थ होते आणि प्रवाशांबरोबरच गणपती बाप्पाचा दहा दिवस प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशी गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातात. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























