Ganpati Festival Special Trains : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपती उत्सव 2023 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना या मार्गावर वसई पनवेल रोहा मार्गे आणि विश्वामित्री कुडाळ या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी 27 जुलै म्हणजे गुरूवारपासून बुकिंग सुरू होणार आहे. या अतिरीक्त गाड्यांमुळं प्रवाशांची गर्दी टाळता येणार आहे. 



1) मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड


गाडी क्रमांक 09009 / 09010 मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गी गाडी आठवड्यातून सहा दिवस असणार आहे. ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार निघणार आहे. ही गाडी 14 सप्टेंबर 2023 ते 18 सप्टेंबर 2023 आणि 20 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या काळात चालवण्यात येणार आहे. ही गाडी रात्री 12 वाजता मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे.   



गाडी क्रमांक 09010  सावंतवाडी रोड ते मुंबई सेंट्रल ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवण्यात येणार आहे. विशेष भाड्याने सावंतवाडी रोडवरुन ही गाडी सोमवार,  मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी सुटणार आहे. 15  सप्टेंबर 2023  ते 19 सप्टेंबर सप्टेंबर 2023  आणि 21 सप्टेंबर 2023  ते 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी पहाटे पाच वाजता सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी आठ वाजून 10 मिनीटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे. 


ही गाडी कुठे कुठे थांबणार


ही गाडी बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबणार आहे. या गाडीचे एकूण 24 कोच आहेत. यामध्ये  2 Tier AC - 01 Coach, 3 Tier AC - 05 Coaches, Sleeper – 12 Coaches, General - 04 Coaches, SLR – 02 आहेत.



2) गाडी क्रमांक 09018 / 09017 गणपती विशेष ट्रेन उधना ते मडगाव (साप्ताहिक) 


उधना ते मडगाव ही साप्ताहिक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी 15 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर या काळात उधना ते मडगाव अशी सुरु राहील. ही ट्रेन देखील वसई पनवेल रोहा मार्गे जाईल. या ट्रेनला 22 कोच असतील.
ही गाडी दुपारी तीन वाजून 25 मिनीटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.


तर ही गाडी 16, 23 आणि 30 सप्टेंबरला मडगाव ते उधना अशी सुरु राहील. सकाळी दहा वाजून 20 मिनीटांनी ही गाडी मनमाडवरुन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी पाच वाजता उधना इथं पोहोचेल.  


ही गाडी नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबेल. 


या गाडीचे एकूण 22 कोच आहेत. ( First AC + 2 Tier AC)  - 01 Coach, 2 Tier AC - 02 Coaches, 3 Tier AC - 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches, General - 03 Coaches, SLR - 01, Generator Car - 01.



3) गाडी क्रमांक 09150 / 09149 विश्वामित्री ते कुडाळ ते विश्वामित्री (साप्ताहिक) 



गाडी क्रमांक 09150 विश्वामित्री ते कुडाळ ही साप्ताहिक विशेष गाडी आहे. ही गाडी सोमवार दिनांक  18 सप्टेंबर 2023 आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता विश्वामित्री येथून सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनीटांनी कुडाळला पोहोचणार आहे.


गाडी क्र.  09149 कुडाळ - विश्वामित्री ही साप्ताहिक विशेष गाडी कुडाळ येथून मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 आणि 26 सप्टेंबर 2023 रोजी साडेसहा वाजता सुटेल ही ट्रेन दुसऱ्या दिवशी एक वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.


ही गाडी भरुच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्टेशन इथं थांबेल. 


या गाडीचे एकूण 21 कोच आहेत. यामध्ये First AC - 01 Coach, 2 Tier AC - 02 Coaches, 3 Tier AC - 06 Coaches, Sleeper – 08 Coaches, General - 02 Coaches, SLR – 01, Generator Car - 01


महत्त्वाच्या बातम्या:


Ganeshotsav 2023 Special Train: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेच्या 52 विशेष रेल्वे फेऱ्या, विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या 208 वर