एक्स्प्लोर

भंडाऱ्यात गर्भवतीवर सलग पाच दिवस सामुहिक बलात्कार

भंडारा : गर्भवतीचं अपहरण करुन तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन करडी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.   दिलीप शेंडे आणि गणेश शेंडे या दोन आरोपींनी 4 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर आळीपाळीने सतत पाच दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे.     सुरेवाडा येथील पीडित महिला ही मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या निलज गावात आईकडे गेली होती. तिथून सूरेवाडाला सासरी परत येत असताना तिच्या भावाने तिला करडीपर्यंत सोडलं. त्यावेळी आरोपी दिलीप शेंडेने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिचं अपहरण केलं. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यावर एका जंगलात बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.   'मी गर्भवती आहे, मला सोडून द्या' असे सांगितल्यावरही या नराधमांनी तिला त्यांच्या गावी नेलं आणि सतत पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत 12 दिवसांनी भंडारा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणलं. इतकंच नाही तर ही महिला पतीच्या दारुच्या आणि मारण्याच्या त्रासाला कंटाळल्यामुळे आत्महत्या करीत होती आम्ही तिला वाचवले असं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलोसांच्या तपासात या नराधमांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं.   माहेरुन परत निघूनही घरी पोहचलीच नसल्याने तिच्या पतीने करडी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली. अपहरण आणि बलात्काराची घटना समोर आल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन गुन्हा नोंदवला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं  
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं  
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक

व्हिडीओ

Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेस, सपाचा पाठिंबा
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेसचा पाठिंबा
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
Embed widget