एक्स्प्लोर
पुण्यात फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार
पुणे: सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटात ही घटना घडली आहे.
उरुळी कांचन - जेजुरी मार्गावर हवेली तालुक्यात शिंदवणे घाट आहे. या घाटात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेतील फॉर्च्युनर पिंपरी-चिंचवड परिसरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही व्यक्ती कोण याचीच चर्चा पुणे परिसरात रंगली आहे.
पीडित महिला केडगावची राहणारी आहे. ती नारायणपूरला देवदर्शनासाठी गेली होती. यावेळी घरी परतण्यासाठी रात्री उशीर झाल्याने पीडित महिला पारगाव चौफुला इथं उभी होती.
त्याचवेळी एकटी असलेली महिला पाहून, फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर फॉर्च्युनर थेट शिंदवणे घाटात नेवून तिथे दोघांनी बलात्कार केला आणि तिला घाटातच सोडून दिल्याचा आरोप आहे.
यानंतर संबंधित महिलेने घाटातूनच निघालेल्या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीने फॉर्च्युनरचा नंबर मिळवून, लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस सध्या पुढील तपास करीत असून, फॉर्च्युनरवाला नेमका कोण हे लवकरच समोर येण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement