Increase Demand for Flowers : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम पाहायला मिळत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणपतीच्या पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळे-फुले आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली आहे. यामुळं दरात देखील वाढ झाली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी गर्दी
आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारची फुल आहेत. फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती फूल मार्केटचे अध्यक्ष अरुण हरिभाऊ वीर यांनी दिली आहे.
बाजारात कोणत्या फुलाला किती दर?
झेंडू : 50 ते 80 रुपये किलो
शेवंती: 150 ते 200 रुपये किलो
गुलाब: 200 रुपायाला 20 फूल
अस्टर: 250 ते 300 रुपये किलो
बिजली : 200 ते 250 रुपये
लिली : 50 रुपये किलो
गुलछडी : 1400 रुपये किलो
बाजारात सध्या गुलछडी सगळ्यात महाग आहे. प्रति किलो गुलछडी खरेदी करण्यासाठी 1400 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्याने गुलछडी महाग झाली आहे. यंदा निशीगंधा फुलाने देखील भाव खाल्ला आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या निशीगंधा म्हणजेच गुलछडी यंदा चांगलाच भाव खाताना दिसत आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये सुका मेवा पेक्षाही महाग किंमतीने निशीगंधा विकला जातोय.
दादर मार्केटमध्येही फुल खरेदीसाठी मोठी गर्दी
दादर फूल मार्केटमध्येही फुल खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. मात्र महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मार्केटला फटका बसला आहे. आलेली फुले मोठ्या प्रमाणात भिजली असल्याने सडून जात आहेत. चांगल्या फुलांची दुप्पट ते पाच पट किंमत वाढली आहे. यातच प्लॅस्टिक च्या फुलांची वाढलेली खरेदी यामुळं देखील मार्केटमधील व्यापारी त्रस्त आहेत.
दादर फूल मार्केटमध्ये कोणत्या फुलाला किती दर?
झेंडू नेहमी 40 आज 110
गुलाब नेहमी 80 आज 110
गुलछडी नेहमी 200 आज 1000
शेवंती नेहमी 100 आज 300 ते 400
जास्वंदी नेहमी 50 आज 500 शेकडा
दुर्वा जूडी नेहमी 10 आज 30 ते 40
कापरी नेहमी 50 आज 120
अष्टर नेहमी 120 आज 200
महत्वाच्या बातम्या: