Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अनेकदा महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरले आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परकीय गुंतवणुकीच्या (Foreign investment) बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या (Gujarat) पुढे असल्याचे जाहीर केले आहे. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीची आकडेवारी एक्स या समाज माध्यमावर शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम : देवेंद्र फडणवीस 


तसेच, राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 


 






 


फडणवीसांचा दावा बोगस : विजय वडेट्टीवार 


देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र (Maharashtra) पहिल्या क्रमांकावर आहे. हा फडणवीसांचा दावा बोगस आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. खरंतर फडणवीस यांनी गुजरातला महाराष्ट्रापुढे नेऊन ठेवल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही',मनोज जरांगेंवर टीका करु नका, आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस; सुप्रिया सुळेंचे प्रवक्त्यांना आदेश


Jayant Patil : 'महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात'; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप