Ganesh Visarjan 2022 Live Updates : पुढच्या वर्षी लवकर या... दगडूशेठ गणपती विसर्जन सोहळा, विसर्जनाची लाईव्ह अपडेट्स..
Anant Chaturdashi 2022 : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर गणरायाला कालपासून निरोप दिला जात आहे. आज विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी देखील काही ठिकाणी विसर्जन सुरु आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शुक्रवाकी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्याने पोलीस प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 400 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा विसर्जन संपन्न झालं आहे.
Nashik : नाशिकच्या शहर परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना भगूरजवळील वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून पती पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. छबु सीताराम गवारी आणि त्याची पत्नी मंदाबाई गवारी हे दोघे जण या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पावसामुळे घराचा पाया कमकुवत होऊन घर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
चंद्रपूर : विसर्जनादरम्यान चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर पोलिसांचा लाठीचार्ज... रात्री दोन वाजेच्या दरम्यान खोब्रागडे कॉम्प्लेक्स जवळ झाला लाठीचार्ज, लाठीचार्जमुळे मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत, यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गणेश मूर्ती ठेवून रास्ता रोको केला. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. लाठीचार्ज करणाऱ्या दुर्गापूर पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल आदेश रामटेके यांना निलंबित करण्यात आलं. तर घटनेची उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक चौकशी करणार आहेत.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील गणेशोत्सव विसर्जन पार पडलंय. मुंबईचा सम्राट हा बाप्पा देखील समुद्राच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते भावूक झाल्याचं दिसलं.
शुक्रवारपासून संथगतीने सुरु असलेल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून पोलिसांनी गती दिलीय. त्यामुळे कालपासून रेंगाळलेल्या मंडळांचे आता वेगाने विसर्जन होतेय.
लालबागचा राजा मागोमाग इतर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पा देखील विसर्जनासाठी समुद्राच्या दिशेनं पुढे येतायत.अजूनही गिरगाव चौपाटीवर गर्दी कायम आहे.
कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला मानवंदना... बाप्पाची मूर्ती तराफ्यावर ठेवली... थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन...
Ganpati Visarjan Live Updates : थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन... बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर...
नाशिक गणेश विसर्जन मिरवणुकीत महापालिकेकडून विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून सहाही विभागातून नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला असून एकूण 1 लाख 77 हजार 403 मूर्तीचे संकलन करण्यात आले. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. पंचवटी विभागातून 63626, सिडको विभागातून 17606, नाशिक रोड विभागातून 50029, नाशिक पश्चिम विभागातून 10485, नाशिक पूर्व विभाग 10546, सातपूर विभाग 25211 अशा एकूण 1 लाख 77 हजार 403 मूर्ती संकलित केल्या आहेत.
मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच... हजारो गणेशभक्तांची हजेरी...
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंची गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.
Ganpati Visarjan LIVE Updates : निरोपा आधी लालबागच्या राजाची आरती... थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन..
दगडूशेठ गणपती निघाला... पुण्यातील बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतेय. दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु होण्यास दुसरा दिवस उजाडला.
मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच... हजारो गणेशभक्तांची हजेरी...
गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा पूर; गणरायाला निरोप देण्यासाठी अजूनही तुफान गर्दी
कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर गणेश उत्सवाचा पूर्णपणे आनंद घेत गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला. मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मिरवणुका लांबल्याने रात्री बारा वाजेपर्यंत खामगाव शहरात 28 मंडळांपैकी फक्त निम्मेच गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होऊ शकलं. रात्री बारापर्यंत फक्त पंधरा गणेश मंडळांचे विसर्जन झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी उरलेल्या गणेश मंडळाचे डीजे बंद करून मिरवणूक आटोपत्या घेतल्यात. उरलेल्या गणेश मंडळ यांचे रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन झालं. त्यामुळे यावेळेस मात्र कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत आनंद लुटला आणि त्यामुळे खामगाव शहरात 28 गणेश उत्सव मंडळाचे गणपती रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जित झालं. लांबलेल्या मिरवणुका यावेळी विसर्जन वैशिष्ट्य ठरलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडलं. त्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणूक आणखी 10 तास चालण्याची शक्यता... दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरुच...
ही शान कुणाची... लालबागच्या राजाची... विसर्जन मिरवणुकीचा थाट... विसर्जनाची लाईव्ह अपडेट्स पाहा
थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन... मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली...
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली...
मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच
कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी पूजा करत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले
Lalbaug Cha Raja Updates: मुंबई पोलिसांनी लालबागच्या राजाला हार घातला, लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी गिरगाव चौपाटीवर पुष्पवृष्टी
Hingoli Ganesh Visarjan Updates: गणेश विसर्जनाची मिरवणूक हिंगोली शहरामध्ये काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान मै हू डॉन या गाण्यावर शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील आणि बंडखोर आमदार संतोष बांगर दोघांनीही ठेका धरत गणेश उत्सवाचा जल्लोष साजरा केला. आमदार बांगर यांच्या श्री बाल शेतकरी गणेश गणेश मंडळाची मिरवणूक हिंगोली शहरातून काढण्यात आली. यादरम्यान या दोघांनी चांगलाच जल्लोष केला
भाजपचे माजी नगरसेवक दिपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास जागेवरून हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी , पोलिसांनी आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डी जे बंद करण्यासाठी गेले. मात्र तरीही दिपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डी जे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.
Nandurbar Ganesh Visarjan: शत्तकोतर वर्षांची परंपरा असलेल्या नंदुरबारमधल्या ऐतिहासिक दादा - बाबा गणपतीच्या रथोत्सवाची हरीहर भेट मोठ्या उत्साहात झाली. रात्री बाराच्या सुमारास मानाचा प्रथम गणपती असलेला दादा गणपती जळका बाजार परिसरात आल्यानंतर दुसऱ्या मानाचा गणपती असलेल्या बाबा गणपतीचा रथ देखील या ठिकाणी आला. परंपरेप्रमाणे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या गणरायाची आरती केली. यानंतर मंत्र पुष्पांजली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणेमध्ये गुलाल आणि फुलांची उधळणकरत हरिहर भेटीचा नयनरम्य सोहळा संप्पन झाला. या हरीहर भेटीला शतकोत्तर वर्षांची परंपरा असुन हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याभरातूनच नव्हे तर गुजरात आणि मध्यप्रदेश मधुन देखील गणेशभक्त याठिकाणी गर्दी केली होती. यंदा गणेश रथांवर कोल्ड फायरचे विशेष आकर्षण देखील दिसून आले.
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पुण्यातील विसर्जन मिरवणुक संथ गतीने सुरु
गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची तुफान गर्दी, काही वेळातच लालबागच्या राजावर गिरगाव चौपाटीवर पुष्पवृष्टी होईल
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटीजवळ पोहोचली आहे. याही वेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी जमली आहे. काही वेळातच गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे.
प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे स्टेज समोरासमोर आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी या दोन्ही गटात तू तू मैं मैं झाल्याचं पाहिला मिळाला होतं. तसे विडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या झोनचे डीसीपी या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
नाशिक महानगरपालिका कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन आज रात्री आठ वाजता झाले. भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. मनपाच्या पूर्व विभागीय कार्यालयात बाप्पाची स्थापना झाली होती.
पनवेल कोळीवाडा येथे विसर्जन घाटावर जनरेटरमधून गेलेली वायर तुटून 11 रहिवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील दोन रहिवासी गंभीर आहेत. आठ रहिवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन रहिवाशांना लाईफलाईन हॉस्पिटल तर एक रहिवासी खासगी रुग्णालयात दाखल आहे.
अहमदनगर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला. शिवसेना गटाच्या पुढे डीजे घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंपरेनुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मिरवणुकीत 14 क्रमांक असतो, त्या जागी शिंदे गटाचा डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता.
पोलीस प्रशासनाकडून चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. नवीन मंडळाना मिरवणुकीत सहभागी व्हायचे असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावे यावर ठाकरे गट ठाम होता. अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे घेण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत सुरू झाली. शिंदे गटाकडून रीतसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत मिरवणूक सुरू करण्यात आली.
मुंबई : लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक भायखळा येथील मुंबई अग्निशमन दालाच्या मुख्यालया समोर आली आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन गाड्यांचे सायरन वाजवून लालबागच्या राजाला सलामी दिली.
Thane : ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळाच्या मंडपावर पिंपळाचे झाड पडले आहे. आरती सुरू असताना हे झाड पडलं आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. पाच व्यक्तींना यात मार लागला असून दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
Ganesh Visarjan 2022 : एक, दोन, तीन, चार...पाहा 'मुंबईच्या राजा'च्या मिरवणुकीचा थाट
अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाला गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत विसर्जनाला नेण्याची वेळ नागरिकांवर आलीय. कारण अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात रस्त्यावर पाणी साठलंय.
पुण्यातील पाचव्या मानाच्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन झालं आहे. आरती करून भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
पालघरमध्ये बाप्पांना मोठ्या भक्तीभावाने बाप्पांना निरोप देण्यात आला. यावेळी बोईसरमध्ये सामाजिक ऐक्याचं दर्शन घडलं. बोईसर परिसरातून बाप्पांना निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकांवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच प्रत्येक भक्ताला गुलाबाच पुष्प देत मुस्लिम विकास संस्थेकडून स्वागत करण्यात आलं.
अहमदनगरमधील मानाचा गणपती माळीवाडा येथील विशाल गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मानाचा गणपती माळीवाडा येथील नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती विसर्जन मिरवणूक सायंकाळी पाच वाजता चितळेरोड येथे आल्यानंतर ठिकठिकाणी भाविकांनी मनोभावे पुजा व आरती करुन दर्शन घेतले. मिरवणूक दरवर्षी प्रमाणे बरोबर सहा वाजता दिल्लीगेट वेशीच्या बाहेर पडली. मिरवणुकीत फुलांनी सजविलेला लाकडी रथ व त्यातील उत्सव मुर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. नाथपंथी डफ वाद्य व ढोल पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. ठिकठिकाणी भाविक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभे राहून दर्शन घेत होते. सायंकाळी सात वाजून 15 मिनिटांनी आरती करुन नालेगांव येथील बारवेमधे मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज व अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांचे हस्ते गणेशाच्या मुर्तिचे विसर्जन करण्यात आले.
पुण्याच्या मानाच्या चौथ्या गणपतीचे 8 वाजून 2 मिनिटांनी विसर्जन झाले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यंत्री देवेंद्र फणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत.
पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक पुन्हा रखडली आहे. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती अलका चौकात येण्यास वेळ लागत आहे. मानाचा चौथा तुळशी बाग गणपती थोड्याच वेळात विसर्जनासाठी येईल. डेक्कन येथील पांचाळेश्वर घाटावर तुळशी बाग आणि केसरी वाडा गणपतीचे विसर्जन होईल.
पुण्यातील मनाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं आहे. बाप्पाला भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.
वर्धा : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झालाय. वर्ध्यातील मांडवा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन चिमुकले आणि वाचविण्यासाठी गेलेल्या एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.
Maharashtra Ganeshotsav Miravnuk : राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका सुरु आहेत. ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी... बाप्पाचा जयघोष करत सर्वजण बाप्पाला निरोप देत आहेत
Pune : मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचं सात वाजून 22 मिनीटांनी विसर्जन झालं आहे.
मुंबई : अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल एक लाख रुपयांना लिलाव करण्यात आलाय. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला.
मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. मिरवणुकीमुळे गिरगावात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
मंबई : लालबागचा राजा साने गुरुजी मार्ग येथे पोहचला आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
मुंबई : जुहू बिचसह मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर यंदा विसर्जनासाठी केवळ मूर्तीसोबत असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जातोय. त्यामुळे समुद्र किनऱ्यांवर यंदा बघ्यांना पूर्णपणे बंदी आहे. पश्चिम उपनगरातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं ठिकाण असलेल्या जुहू बिचचा संपूर्ण किनाराच बांबूंनी सील करण्यात आलाय. हवामान विभागानं दिलेला अतिवृष्टिचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदा विसर्जनादरम्यान संपूर्ण समुद्र किनारा रिकामा पाहायला मिळतोय.
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी 713 बाप्पांना निरोप देण्यात आला. जिल्हाभरात 1 हजार 993 बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरी भागात 516, ग्रामीण भागात 1,477 बाप्पांचा यात समावेश आहे. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Nashik Ganeshotsav : नाशिक मध्ये आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला असून शिवसेवा युवक मैत्रमंडळाच्या मिरवणुकीत तांडव नृत्य आकर्षण ठरले आहे. सध्या मिरवणुकीचा माहोल संपूर्ण नाशकात पहायला मिळत असून त्यातच मिरवणुकीत हे तांडव नृत्य तांडव घालताना दिसत आहे. नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच गणपती पैकी एक असलेल्या महागणपती विसर्जन मिरवणुकीत हे तांडव नृत्य साकारले जात आहे. हरियाणाहून हे तांडव नृत्य करणारी मंडळी आली असून मिरवणुकीत धमाल करीत आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. बाल चमुच्या लेझीम खेळाणे या मिरवणुकीची रंगात वाढवली. महाद्वार घाटावर पालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात बाप्पाची मूर्ती देण्यात आली.
Nashik Ganeshotsav : नाशिक मध्ये आज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम अनोखा उदाहरण पाहायला मिळाले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अजान सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली. जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं. त्यानंतर अजून होईपर्यंत काही वेळेसाठी ही मिरवणूक देखील थांबवण्यात आली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजात एक अनोखा एकोपा असल्याचा हे जिवंत उदाहरण नाशिक मध्ये पाहायला मिळाले. बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अत्यंत सकारात्मक असा संदेश या माध्यमातून संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला सुद्धा देण्यात आला.
पुणे : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील घरातील गणरायास निरोप देण्यात आला.
नांदेड : गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत नांदेड दक्षिण काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी बाप्पांच्या मिरवणुकीत झिंगाट डान्स केलाय. गणपती बाप्पाला आज निरोप देताना ढोल ताशांच्या गजरात आमदार हंबर्डे यांनी ठेका धरला. यावेळी आमदार हंबर्डे यांनी ढोल ताशाच्या गजरात मतदार संघातील गणपतींना अभिवादन करत आणि विसर्जनाचा आढावा घेत गणपती मिरवणुकीचा नाचून आनंद घेतलाय.
Nashik Ganeshotsav : नाशिक शहरातील वाकडी बारव येथून गणेश मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर आता मिरवणूक मेनरोड परिसरात आहे. यावेळी नाशिककरांचा उत्साह, ढोलवादानाचा नाद यांसह उत्साहपूर्ण जोशाचे वातावरण मिरवणुकीत पाहायला मिळते आहे. मानाचा गणपती चांदीचा गणेश सध्या अग्रभागी असून सहस्त्रनाद ढोलपथका ची रंगत वाढली आहे.
ठाण्यातील एक सर्वात जुना आणि मानाचा गणपती म्हणजे लोकमान्य आळीचा गणपती आहे. लोकमान्य टिळक यांनी 103 वर्षापूर्वी या गणपतीची स्थापना केली होती. अजूनही त्यांना अपेक्षित अशा प्रकारे हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. याच गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. हातात टाळ घेऊन भजन करत ही मिरवणूक सुरू झाली आहे. गणपती देखील शाडूच्या मातीचा आणि एका पालखीत बसवून विसर्जनासाठी नेला जातोय.
पुण्यातील अल्का चौकात भाविकांनी रुग्णवाहिकेला मार्ग खुला करून देत संवेदशीलता दाखवून दिली
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन 5:38 मिनीटांनी झालं आहे. विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
लालबागचा राजा श्रॅाफ बिल्डिंगजवळ पोलोचला आहे. मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी असून लालबागच्या राजावर पृष्पवृष्टी होत आहे.
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी ढोल ताश्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी पोलिसांनी ढोल ताशाच्या गजरात बंदोबस्ता बरोबर गणपती मिरवणुकीचा नाचून आनंद घेतला.
बारामती आणि इंदापूर येथे गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाल्यानंतर बारामती शहर व इंदापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये गाण्याच्या तालावर पोलिसांनी देखील गाण्याच्या तालावर ठेका धरला. कामाचा ताण-तणाव विसरून पोलीस कर्मचाऱ्यांनी गाण्यावर ठेका धरत मिरवणुकीचा आनंद लुटला.
सांगली : मिरजेत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकी वेळी मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. गणरायाच्या मूर्तीवर छत्री धरत पावसातच विसर्जन मिरवणुका सुरु आहेत.
Ganpati Visarjan 2022 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह; जागोजागी ढोलपथकांचा गजर
परभणी : दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय. परभणीत देखील भर पावसात लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिलाय जातोय. सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे आणि याच पावसात शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती यांचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलीय. याच ठिकाणी शहरातील आणि आसपासच्या सर्व गणपतींचे विसर्जन केले जात आहे. भर पावसात जसं जमेल तसे कुटुंबासह परभणीकर या तलावावर येऊन बाप्पाना निरोप देत आहेत. दुपारपर्यंत इथे जवळपास 250 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तलाव परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला आहे.
मुंबई : भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर प्रमुख मार्गदर्शक असलेल्या दहिसर, ओवरीपाडा येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आयोजक प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मंडळाचे सचिव सम्राट कदम, दिलीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : गेटवे ऑफ इंडिया जवळ विसर्जनाला परवानगी दिल्यानंतर आज गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये मोठ्या उत्साहात भाविक गणपती बाप्पाला निरोप देताना पाहिला मिळाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाविदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक अटींवर या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी बीपीटीने परवानगी दिली आहे. मुंबई पालिकेने देखील या ठिकाणी विशेष खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या गणेश मूर्तींसाठी दोन क्रेन या ठिकाणी मुंबई पालिकेकडून आणण्यात आलेल्या आहेत. शिवाय जीवरक्षक दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. सोबतच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
मुंबई : श्रॅाफ बिल्डिंगजवळ रंगारी बदक गणपतीचा सन्मान करण्यात आला. पुष्पवृष्टीसह सामूहिक आरती यावेळी पार पडली.
पुण्यातील विसर्जन मिरवणुक रेंगाळली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकातून पुढे विसर्जनासाठी गेल्यानंतर अर्धा तास होऊनही मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती अलका चौकात आलेला नाही.
मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रीय झालीय. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या गर्दीतील अनेक मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र लुटण्यात आले आहेत. जमावाने सुमारे 50 मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या सोनसाखळ्या लुटल्या आहेत. या चोरीची फिर्याद देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात रांग लागली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात पोलीस व्यस्त आहेत. लालबागचा राजा गणपती परिसरातून वळत असताना मोठी गर्दी जमली आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरीची घटना दुपारी 1 ते 1:30 च्या दरम्यान घडल्याचे बहुतांश तक्रारदारांनी सांगितले. काळाचौकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधून गणपती उत्सवादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना अटक केली होती.
कोल्हापूर शहरामध्ये मिरवणुकीला रंग चढला असून प्रमुख तालमींची मुख्य मार्गावर एन्ट्री झाल्याने पोलिस सतर्क झाले आहेत. ध्वनीयंत्रणा, पारंपरिक वाद्य, झांजपथक, धनगरी ढोल ताशा पथक तसेच सजीव देखाव्यांनी मिरवणुकीमध्ये रंगत भरत चालली आहे. पन्हाळा वाचवा, लोकराजा शाहूंच्या आठवणी, कोल्हापूर हद्दवाढ आदी देखावे लक्ष वेधून घेत आहेत.
इराणी खणीमध्ये दुपारी तीनपर्यंत 230 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या महाद्वार रोडवर एक तासापेक्षा जास्त काळ थांबता येत नसल्याने मिरवणूक वेळेमध्ये मार्गक्रमण करत आहे.
नाशिक शहरातील वाकडी बारव येथून गणेश मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर आता मिरवणूक मेनरोड परिसरात दाखल झाली आहे. यावेळी नाशिककरांचा उत्साह, ढोलवादानाचा नाद यांसह उत्साहपूर्ण जोशाचे वातावरण मिरवणुकीत पाहायला मिळते आहे. मानाचा गणपती आणि चांदीचा गणेश सध्या अग्रभागी असून सहस्त्रनाद ढोलपथकाची रंगत वाढली आहे.
मुंबई : थायलंडच्या गणेशभक्तांचा एक ग्रुप गिरगांव चौपाटीवर आला आहे. या ग्रुपकडून भक्तांना पाणीवाटप करण्यात येत आहे.
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत हरवलेला चिमुरडा पोलिसांनी पालकांकडे सुखरूप सोपवला आहे. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत एक चिमुरडा हरवला होता. पोलिसांनी सातत्याने अनाऊसमेंट केल्यानंतर त्याचे वडील दोन तासांनंतर त्याला घ्यायला आले आणि चिमुरड्याला सुखरूप आपल्या पालकांकडे सोपवले.
देशात कायमच विविध सण संभारभ याचा माहोल असतो. पोलीस मात्र संरक्षणासाठी कायमच कामावर असतात. कोणत्याही सणाचा आनंद पोलिसांना घेता येत नाही. कारण पोलीस 24 तास कर्तव्यावर असतात. लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मात्र पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन करण्याच्या मिरवणुकीमध्ये ताशाच्या ठेक्यावर ताल धरलेला पाहायला मिळाला. हे कर्मचारी गणेशाचा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आनंद घेत होते. या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर हे पोलीस कर्मचारी पुन्हा पहाटेपर्यंत कर्तव्यावर हजर राहणार आहेत. कर्तव्यावर असल्यामुळे सणांचा आनंद घेता येत नाही. यामुळे सर्वात आधी पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन करून पोलिसांनीही आनंद घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
वर्ध्यात नागरिकांचा पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाकडे कल दिसून येत असून ठिकठिकाणी कृत्रिम हौदची व्यवस्था करण्यात आली असून आर्वी नाका येथे नगरपरिषद आणि ॲक्टिव्ह बडीज क्लबच्या वतीने आयोजित गणपती बाप्पांसोबत सेल्फी पॉईंटमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. त्यानंतर कृत्रिम हौदात मध्ये बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केलं. मात्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.
वर्ध्यात नागरिकांचा पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाकडे कल दिसून येत असून ठिकठिकाणी कृत्रिम हौदची व्यवस्था करण्यात आली असून आर्वी नाका येथे नगरपरिषद आणि ॲक्टिव्ह बडीज क्लबच्या वतीने आयोजित गणपती बाप्पांसोबत सेल्फी पॉईंटमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. त्यानंतर कृत्रिम हौदात मध्ये बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केलं. मात्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.
वर्ध्यात नागरिकांचा पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाकडे कल दिसून येत असून ठिकठिकाणी कृत्रिम हौदची व्यवस्था करण्यात आली असून आर्वी नाका येथे नगरपरिषद आणि ॲक्टिव्ह बडीज क्लबच्या वतीने आयोजित गणपती बाप्पांसोबत सेल्फी पॉईंटमध्ये अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. त्यानंतर कृत्रिम हौदात मध्ये बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केलं. मात्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.
गिरगावच्या राजाच्या मिरवणुकीत हजारोंची गर्दी पाहायला मिळतं आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणतं भाविक भक्तीभावानं लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत.
कोल्हापूर : मुख्य महाद्वार रोडवरून दुपारी दोनपर्यंत 150 गणेश मूर्ती पास, तर इराणी खाणीत 75 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळांशी चर्चा करून केलेल्या नियोजनामुळे उद्देश सफल होत असल्याचे दिसून येत आहे.
जुहू चौपाटीवर हेलिकॉप्टरद्वारे विसर्जन स्थळी पाहणी केली जात आहे. विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.
Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या शिवसेवा गणेश मंडळाचा महागणपतीची मिरवणूक सुरू झालीय. यात शंकराची वेशभूषा धारण केलेला कलाकार ढोलच्या तालावर ठेका घेत नाचणारे जटाधारी वानर सेना सहभागी झालेत
मुंबईला जाणारी वाहतूक पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रोखली. गणेश विसर्जनाला मुंबईत झालेली गर्दी पाहून, हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. अचानकपणे वाहतूक रोखल्याने प्रवासी संतप्त झालेत. तासाभरापासून प्रवासी रखडले. किती वेळ वाहतूक रोखणार हे अनिश्चित आहे.
मुंबईत गणपती विसर्जनासाठी महापालिकेनं जय्यत तयारी केलीय. तब्बल दहा हजार कर्मचारी त्यासाठी तैनात केलेत. विसर्जन स्थळी साडेसातशेहून अधिक जीवरक्षक, ४५ मोटार बोट, ३९ जर्मन तराफा यासह स्पीड बोटीही सज्ज करण्यात आल्यात.
मुंबईचा उपनगरांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्यावतीने यंदा देखील कृत्रिम तलाव गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीओपी मूर्तींसाठी वेगळा तलाव आणि शाडूच्या मूर्तीसाठी वेगळा तलाव तयार करण्यात आला आहे. यासोबतच आकर्षक तलावाला सजावट देखील करण्यात आली आहे.
मुंबई, पुण्यात विसर्जनाचा उत्साह
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सागर निवासस्थानी बाप्पाची आरती करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सागर निवासस्थानी बाप्पाची आरती करण्यात आली.
बिग बीं अमिताभ बच्चन यांच्याकडून अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवरात्र उत्सवाच्या मंडपाचं भूमीपूजन पार पडत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं.
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा : देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर महापालिकेकडून सार्वजनिक गणेश विर्सजन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात येत आहे. तसेच वृक्षारोपणाचे महत्व समजण्यासाठी रोपही भेट देण्यात येत आहे.
शिवसेना आमदार यांनी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.
दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध हटल्यावर विसर्जन मिरवणुकांसाठी हजारोंचा जनसागर लोटला आहे. लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जात आहे.
Nashik Ganeshotsav : अखेर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. नाशिक शहरातील नेहमीच्या वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी होता. त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती समजला जाणारा रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा.
विरोधी पक्षनेतेअजित पवार यांच्याकडून जनतेला अनंत चतुर्दशी'च्या शुभेच्छा.
Nashik Ganeshotsav : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शहरातील प्रमुख 15 गणेश विसर्जन ठिकाणी वैद्यकीय पथकांचा सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात आले आहेत तसेच गोदा घाटासह शहरातील इतर घाटांवर जीव रक्षक अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापना आणि सुरक्षा पथकासह वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे
Aurangabad: औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची या मिरवणुकीत सहभाग पाहायला मिळत आहे. तर गणपती मिरवणुकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूर शहरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून तीन मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खाणीमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या दोन तासांमध्ये 50 हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेकडून इराणी खण परिसरात 12 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर तांबट कमान येथेही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. गणेश मूर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 13 तराफे व 4 क्रेनसह 430 हमालांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना विशेष रंगाची टोपी व ओळखपत्र देण्यात आले आहे.
लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असून वाजत-गाजत राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यात रोहित पवार यांच्याकडून विसर्जन मिरवणुकीत ढोलवादन
गणेश चतुदर्शीच्या निमित्त्यानं बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आता कोणीही गणपती विसर्जन करणार नाही याची खबरदारी घ्या, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं जारी केले आहेत. तसेच कायद्याच्या तरतुदींचा भंग करून अथवा राज्य सरकारनं जारी केलेल्या विसर्जनासाठीच्या परिपत्रकाचा अवमान करून जर कोणीही दहिसर नदीत गणपती विसर्जनाचा प्रयत्न केल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे स्वातंत्र्य राहिलं, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलेलं आहे
नागपूरः शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलाव, पोलिस लाईन टाकळी यासह सर्वच तलावांमध्ये विसर्जनास पूर्णत: बंदी आहे. या सर्व ठिकाणी मनपाद्वारे लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत. याशिवाय झोननिहाय 24 रबरी पूल व जागोजागी निर्माल्य संकलनासाठी 93 कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत.
CM Eknath Shinde : शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात असणाऱ्या वरळीतील गणपती बाप्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतलं.
नागपूरः नागपूर महानगरपालिकेद्वारे गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात झोननिहाय कृत्रिम टॅंक आणि फिरत्या मोबाईल कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 ठिकाणी 390 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनस्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location ही वेब लिंक ही जारी करण्यात आली आहे.
नागपूरः गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण कामामुळे यावर्षी एम्प्रेस मॉलच्या समोर श्रींची मूर्तीच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे मनपातर्फे 10 कृत्रिम टँक लावण्यात आले असून 4 फुटापेक्षा लहान मूर्तीचे विसर्जन येथे होणार आहे. वाहनांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व निर्माल्य संकलनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सर्वपक्षीय आरती करण्यात येत आहे. त्यामुळे थोड्याच वेळात मिरवणूक निघणार आहे. यावेळी शिवसेना,भाजपसह सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
बोरीवली पूर्व इथल्या मागाठाणे परिसरात विराजमान झालेल्या 'उपनगरचा राजा' ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्त आणि कार्यकर्ते भावूक झालेले पाहायला मिळतायत. कोरोना काळात गेली दोनवर्ष हा सण जल्लोषात साजरा करता न आल्यानं यंदा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहताना दिसतोय.
थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
कोल्हापूर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. शहरातील पहिल्या मानाचा बाप्पा असलेल्या तुकाराम माळी मंडळाचा गणराया विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ केला आहे. कोल्हापूरमध्ये कळीचा मुद्दा असलेल्या हद्दवाढीवरून या मंडळाने केलेला बुलेटस्वार गणपती मार्गस्थ झाला आहे.
Laughcha Raja Visarjan : लालबागच्या राजाची आरती लाईव्ह
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात.
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीमध्ये आतापर्यंत एकाही मूर्तीचे विसर्जन होऊ देण्यात आलेले नाही. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाकडून आजही विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे.
बाप्पा सगळी विघ्न दूर करेल : चंद्रकांत पाटील
राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पुण्यात मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. तर औरंगाबादमध्येही आता विसर्जन मिरवणूकीची तयारी सुरु आहे. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. त्यामुळे थोड्याच वेळात मिरवणूक निघणार आहे.
पुण्यातही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय.
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये सकाळपासून वातावरण मोकळं झालं असून रात्रीच्या मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. थोड्याच वेळात नाशिकमध्ये शहरातील वाकडी बारव या ठिकाणाहून मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शहरावासीयांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरांतील महत्वाच्या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे.
आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल.
Pune : पुण्यातील व्यापाऱ्याकडून दगडूशेठ गणपतीला मोतीचूरचा 130 किलोचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण
Ganpati Visarjan 2022 : थोड्याच वेळात आरतीनंतर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. यामध्ये मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर काढला जातो. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. आता गणेशगल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
विसर्जन मिरवणुकीवर प्रशासनाची करडी नजर आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे.
कोल्हापूर शहरातील पहिला मानाचा गणपतमी म्हणून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीला मान आहे. या बाप्पाला पहिल्यांदा विसर्जनाचा मान आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते बाप्पांची आरती पार पडल्यानंतर विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मनपा प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. यावेळी शाहू महाराज यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यसाठी बाप्पाकडे मागणे केल्याचे ते म्हणाले.
दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त मिरवणुका
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रथाचे मुख्य आकर्षण असते. यंदा दाक्षिणात्य धर्तीवर श्री स्वानंदेश रथ उभारण्यात आलंय. पन्नास हजार दिव्यांची आकर्षक रोषणाई आज भाविकांचं लक्ष वेधनार आहे.
तुकाराम माळी तालीम मंडळाचा बाप्पा हा कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती आहे... या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली की शहरातील विसर्जन मिरवणूक सुरू होते...खासबाग मैदानापासून या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होतेय...शाहू महाराज यांच्या हस्ते आरती होऊन थोड्याच वेळात कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे...पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात ही विसर्जन मिरवणूक सुरू होईल
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
पार्श्वभूमी
Anant Chaturdashi 2022 : आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात.
मुंबईत विसर्जन मिरवणुकीची धूम
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. साश्रू नयनांनी गणेशभक्त बाप्पाचं विसर्जन करतील. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होईल. लालबाग, परळ सारख्या मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळेल. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळेल. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.
मुंबईचा राजापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. यामध्ये मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर काढला जातो. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात.
पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त
राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -