एक्स्प्लोर

गणपती विसर्जनाला गालबोट, राज्यभरात 15 जण बुडाले

अनंत चतुर्दशीला विसर्जनावेळी झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्ताने लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी लोटली आहे. मात्र राज्यभरात काही ठिकाणी विसर्जन सोहळ्याला गालबोट लागलं आहे. दिवसभरात विसर्जनावेळी झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुणे - वडकी येथील गायधरा तलावात दोन मुलं गणपती विसर्जनावेळी बुडाली होती. रोहित संतोष जगताप व ओमकार संतोष जगताप अशी या दोन भावंडांची नावं असून त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. हा तलाव वडकी परिसरातील आहे. आळंदीच्या हद्दीतील खेडमध्ये घरगुती गणपती विसर्जन करण्यास गेलेला 18 वर्षीय तरुण इंद्रायणी नदीत बुडाला. अक्षय अनिल वरपे असं त्याचं नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. NDRF चे जवान तरुणाचा शोध घेत आहेत. औरंगाबाद - बिडकीनजवळच शिवनाई तलावात गणपती विसर्जन करताना तीन तरुण बुडाले. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड यांचा मृत्यू झाला असून तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. गोदावरी नदीपात्रात तरुण बुडाल्याची माहिती आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी दौलताबाद तलावात बुडून आकाश साठेचा या 14 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. औरंगाबादेत तीन घटनांमध्ये पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नाशिक - गणपती विसर्जनावेळी आई-वडिलांसोबत गेलेल्या किशोर सोनार या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दारणा नदीपात्रात बाप्पासोबत सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये बुडालेला तरुण नाशिकमध्ये बुडालेला तरुण गणपती विसर्जनादरम्यान नाशकातील मुंगसरे गावाजवळील डबक्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दोघा मित्रांसोबत घरच्या गणपतीचं विसर्जन करायला गेला असता गणेश मराळे हा 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी - जगताप डेअरी जवळ कस्पटे वस्ती येथे दोन मुलं बुडाली. औंध अग्निशमन केंद्रातील जवानांनी एक मृतदेह पाण्याबाहेर काढला असून दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. बीड - गणपती विसर्जनावेळी नदीपात्रात बुडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बीडमधील माजलगाव तालुक्यातील उमरीच्या सरस्वती नदीपात्रात गणेश विसर्जन करताना पांडुरंग महादेव घायतिडकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सागर धनगर आणि योगेश धनगर या दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीमध्ये ही घटना घडली.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget