CM Eknath Gadchiroli Visit LIVE: : गडचिरोलीत पावसाचा कहर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर, वाचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Gadchiroli Rain Update: गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून पुढील दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. वाचा प्रत्येक अपडेट्स.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2022 10:24 PM
दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार: मुख्यमंत्री

Gadchiroli: गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी (Eknath Sambhaji Shinde) पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडीकल कॉलेज सुरू करणार असे जाहीर केले. ते आज पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीला आले होते. त्याच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गडचिरोलीत पूर परिस्थितीची पाहणी 

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली.

वैनगंगा नदीच्या पुलावरुन प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे उपस्थित होत्या.

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार बैठक 

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनासह बैठक होणार आहे.  


गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी भागात कालपासून निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट गडचिरोलीत दाखल होत आहेत. मुंबईवरून नागपुरात दाखल झाल्यानंतर ते दोघे हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला येणार होते. मात्र, नागपूर परिसरात पाऊस असल्याने आणि हवामान अनुकूल नसल्याने हेलिकॉप्टरचा प्रवास शक्य झाला नाही. त्यामुळे दोघांनी 160 किमीचा प्रवास सडक मार्गाने करण्याचा निर्णय घेतला. 


गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाची आढावा बैठक होणार असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने उचललेले पाऊल आणि पुढे दोन- तीन दिवस पावसाची परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. 

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 160 किमीचा प्रवास सडक मार्गाने

Vidarbha : मुंबईवरून नागपुरात दाखल झाल्यानंतर दोघे हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला पोहोचणार होते. मात्र, नागपूरसह परिसरात जोरदार पाऊस असल्याने आणि हवामान अनुकूल नसल्याने हेलिकॉप्टरचा प्रवास शक्य झाला नाही. परिणामी दोघांनी सुमारे 160 किमी चा प्रवास सडक मार्गाने करण्याचा निर्णय घेतला.

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोलीत दाखल

गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रशासनाची आढावा बैठक होणार असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने उचललेले पाऊल आणि पुढे दोन तीन दिवस पावसाची परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या तयारी चा आढावा घेतला जाणार आहे.

Gadchiroli Rain Update : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नागपूरमध्ये पोहोचले, गडचिरोलीला रवाना

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.  तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.


 

Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यात 24 तासांत 52 मिलीमीटर पावसाची नोंद

जिल्ह्यात पुरपरिस्थिती नियंत्रणात असुन 353 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 

Gadchiroli Rain Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात गडचिरोलीत दाखल होणार

गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील 2 दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गडचिरोली दौऱ्याचं नियोजन केलं आहे. ते आज पहिला नागपूरला पोहोचतील. तिथून ते गडचिरोलीला जातील. 


 

पार्श्वभूमी

CM Eknath Gadchiroli Visit LIVE:  : गडचिरोलीला पावसाचा (Gadchiroli Rain) जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील 2 दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गडचिरोली दौऱ्याचं नियोजन केलं आहे. ते आज दुपारी नागपूरला पोहोचतील. तिथून ते गडचिरोलीला जातील. 


दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे  अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.  


हवामान विभागाकडून रेड अलर्ट, 3 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी 
गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येतायत. पुढील 3 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलीय. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत. गडचिरोलीच्या भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यापैकी तुमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतोय. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पर्यायी रस्ताच वाहून गेल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे. 


NDRF आणि SDRF च्या टीम अलर्ट
दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना देखील मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.