Shahrukh Khan Son's Brand Dyavol : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या क्लोदिंग ब्रँडमुळे चर्चेत आला आहे. सध्या आर्यनच्या ब्रँड प्रमोशनची जबाबदारी शाहरुख खानने घेतल्याची दिसत आहे. आर्यन खानचा फॅशन ब्रँड D'YAVOl चं नवीन कलेक्शन लाँच होणार आहे. शाहरुख खानने त्याच्या एक्स मीडिया अकाऊंटवरुन याबाबत घोषणा करत 12 जानेवारीला D'YAVOl X-3 कलेक्शन लाँच होणार असल्याचं सांगितलं आहे. D'YAVOl X-3 कलेक्शन मास्टरपीस असेल, असंही यावेळी त्याने सांगितलं आहे. दरम्यान, या ब्रँडचं नवीन कलेक्शन लाँच होण्याआधीच यावरुन वाद सुरु झाला आहे. 


अभिनेता शाहरुख खानकडून मोठी चूक


शाहरुख खानने त्याच्या एक्स मीडिया अकाऊंटवरुन या ब्रँड प्रमोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ब्रँडच्या टीझरमध्ये शाहरुख खान त्याच्या स्टायलिश अंदाजात एन्ट्री केल्याचं दिसत आहे. शाहरुख खानने शेअर केलेल्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये त्याने आर्टप्रेमी नाराज आहेत. शाहरुख खानने कलाप्रेमींच्या अपमान केल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.


ब्रँड प्रमोशनवेळी कलाप्रेमींचा अपमान


टीझरमध्ये शाहरुख खान एका म्युझियममध्ये असल्याचं दिसत आहे. म्युझियममध्ये अनेक कलाकृती ठेवल्या आहेत. याच्या मधोमध मोनालिसाची पेंटिंग आहे, ज्याला मास्टरपीस म्हटलं गेलं आहे. यावेळी Timeless, Priceless, Treasure आणि Iconic हे शब्द हायलाईट करण्यात आले आहेत. शाहरुख मोनालिसाच्या पेंटिंगजवळ जातो आणि त्याऐवजी जॅकेट ठेवतो. याद्वारे तो असं दाखवतो की, मास्टरपीस मोनालिसा नाही, तर जॅकेट आहे. यानंतर मोनालिसाची पेटिंग जमिनीवर पडलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर X लोगो आहे. हा आर्यन खानच्या ब्रँडचा लोगो आहे. 


शाहरुख खानची सोशल मीडिया पोस्ट






मोनालिसाची पेंटिंग का प्रसिद्ध आहे?


मोनालिसा पेंटिंग जगातील सर्वात प्रसिद्ध आणि रहस्यमय चित्रांपैकी एक आहे. ही पेंटिंग इटालियन कलाकार लिओनार्डो दा विंची यांनी 1503-1506 मध्ये काढली होती. मोनालिसा पेंटिंग लिओनार्डो दा विंची यांनी फ्रान्सचा राजा फ्रान्सिस I साठी तयार केली होती. लिओनार्डो दा विंचीला पेंटिंग बनवायला 4 वर्षे लागली. या पेटिंगमधील महिलेचं नाव लिसा डेल जिओकोंडो असून ती एका इटालियन व्यावसायिकाची पत्नी आहे.


पेंटिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचं स्मित आणि अतिशय रहस्यमय खूपच आकर्षक आहे. फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला याने 1517 मध्ये ही पेंटिंग विकत घेतली. यानंतर ही पेंटिंग फ्रान्सच्या रॉयल पॅलेसमध्ये ठेवण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ही पेंटिंग लूवर संग्रहालयात हलवण्यात आली. सध्या मोनालिसा पेंटिंग लूवर संग्रहालयात ठेवण्यात आली असून ते जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


"त्याने अचानक माझ्या अंडरवेअरमध्ये हात टाकला", प्रसिद्ध अभिनेत्रीचा अनेकदा लैंगिक छळ, धक्कादायक खुलासा करत म्हणाली...