मुंबई : गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.


गडचिरोलीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते.  याबाबत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे झालेल्या या हल्ल्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.



या नक्षलवादी हल्ला प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितलं.

या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत नोकरी दिली जाईल, असं देखील गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं.

मात्र या हल्ल्यानंतर या पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या विरोधात भावना तीव्र होत्या. शहीद पोलिसांच्या पत्नीने देखील शैलेश काळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. म्हणून पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचं निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली. यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काळे यांचं निलंबन करण्याबाबत घोषणा केली.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील 25 जवान खासगी वाहनाने प्रवास करत होते. त्यावेळी नक्षलींनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात त्यातील्या 15 जवानांचा जागीच मृत्यू झाला होता. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या.



संबंधित बातम्या

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानांची नावे


गडचिरोली नक्षलवादी हल्ला : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांची मागणी


गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद