याप्रकरणी त्यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात कनेरी येथे संजय गंडाटे गेल्या काही वर्षापासून मोत्यांची शेती करतात. या आगळ्या-वेगळ्या शेतीतून आणि प्रचंड मेहनतीतून संजय यांनी कमी वेळातच आर्थिक प्रगती साधली.
या शेतीला आकर्षित होऊन राज्यातूनच नव्हे तर देशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण घेण्यात गडचिरोलीत आले. इतकेच नव्हे तर राज्य सरकारनेही मोत्यांची शेती सरकारी योजनेत सामिल करण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कनेरी येथील मोत्यांच्या शेतात चोरी केली आणि १२०० शिंपले चोरून नेले.
एका शिंपल्यात दोन मोती ठेवलेले असतात. त्यामुळे चोरुन नेलेल्या मोत्यांची संख्या २४०० वर पोहोचते. त्यामुळे संजय यांचे सात लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
संबंधित बातमी