देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. 4 तासांच्या बैठकीनंतरही खातेवाटपाचं भिजत घोंगडं, ९५ टक्के एकमत झाल्याची अजित पवारांची माहिती, खातेवाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

2. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज भास्कर जाधव गुहागरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार, तर तानाजी सावंतांसाठी उस्मानाबादचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

3. आरोप-प्रत्यारोपानंतर 24 तासांत खडसे आणि महाजनांचं मनोमिलन, रात्री उशिरा फडणवीस जळगावमध्ये दाखल, औरंगाबाद झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीही आज मतदान

4. आंबिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत, मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

5. मुंबई चार दिवसांत आणखी गारठणार, पारा 15 अंश सेल्सीअसवर आल्याने शहरात बोचरी थंडी, आगामी पूर्ण आठवडाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता

Ministry Distribution | उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा घोळ मिटेचिना...| ABP Majha



6. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापलं, विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप तर संजय राऊतांचीही आगपाखड

7. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती, पुण्यात भिडे वाड्यापासून रॅली, तर सकाळी साडेनऊ वाजता सावित्रीबाईंची जीवनगाथा

8. शिवसेनेसोबत गेलेल्या काँग्रेसकडून महाराष्ट्रात विचारांना तिलांजली, भाजपाध्यक्ष अमित शाहांचा आरोप, नागपुरातील कार्यक्रमात फ़डणवीसांचं कौतुक

9. विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळीनं शेतकरी देशोधडीला

10. लोकसभा, विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतूनही भाजप हद्दपार, बजरंग पाटील नवे अध्यक्ष, तर नाशिक झेडपीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा