मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल 86.25 रुपये मोजावे लागले होते, काल सोमवारी पेट्रोलने त्यापुढे म्हणजेच 86.56 रुपयांपर्यंत मजल मारली. आजही ही आगेकूच कायम राहात पेट्रोल 86.72 रुपयांपर्यंत पोहोचलं. पेट्रोलचा हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे.
दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली. मुंबईतील डिझेलचा प्रतिलिटर दर 75.74 रुपये इतका आहे.
महाराष्ट्रात अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 87.97 रुपये प्रति लिटर इतका आहे. काल हा दर 87.81 रुपये इतका होता. त्यामध्ये आज 16 पैशांनी वाढ झाली.
अमरावतीनंतर सर्वाधिक पेट्रोल दर असणाऱ्या शहरांच्या यादीत आज सोलापूर दुसऱ्या नंबरवर आहे. सोलापुरात पेट्रोलचा दर 87.77 इतका आहे. तर काल दुसऱ्या नंबरवर असलेल्या औरंगाबादच्या नंबर तिसरा लागला आहे. औरंगाबादेत लिटरसाठी 87.76 रुपये मोजावे लागतात.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई – 86.72
पुणे 86.52
ठाणे – 86.80
नाशिक 87.10
औरंगाबाद – 87.76
नागपूर – 87.20
कोल्हापूर 86.90
सोलापूर – 87.77
अमरावती – 87.97
सिंधुदुर्ग – 87.63
अहमदनगर – 86.57
आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं.
शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं