एक्स्प्लोर

उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचा मोफत पास

पूर्वी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली असून आता नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतील विद्यार्थ्यांनाही येत्या 1 जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले.

मुंबई : राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 76 तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांनाही उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. पूर्वी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली असून आता नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतील विद्यार्थ्यांनाही येत्या 1 जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले. पावसाअभावी शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थीतीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीत लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी 100 टक्के सवलत देण्यात येत असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितले. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. एसटी महामंडळाने मोफत प्रवास सवलत पास योजना राबवून ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या 66.67 टक्के इतकी सवलत देण्यात येते. शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत 100 टक्के इतकी देण्यात येत आहे. आता या योजनेत नवीन दुष्काळग्रस्त महसुली मंडळांचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंची खंत, मविआच्या बैठकीला जयंत पाटलांसह 23 आमदार अनुपस्थित
महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंची खंत, मविआच्या बैठकीला जयंत पाटलांसह 23 आमदार अनुपस्थित
महाराष्ट्रासाठी धान्य वितरणाची मुदत वाढवली, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश, लाखो लाभधारकांना दिलासा
महाराष्ट्रासाठी धान्य वितरणाची मुदत वाढवली, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश, लाखो लाभधारकांना दिलासा
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2026 | बुधवार

व्हिडीओ

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Embed widget