Laxman Hake : ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही हे सरकारने (Govt) लेखी द्यावं यासाठी प्रा लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दोघांचीही तब्बेत खालावली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं या मागणीवर ठाम लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे ठाम आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दोघांचीही तब्बेत खालावली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक असल्याचे मत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
OBC आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे महाराष्ट्राला सांगा
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं सांगितलं असलं तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणं आवश्यक असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. कायद्याला धरुन नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावं असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. तर त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी मुखमंत्र्याना ओबीसी एससी, एसटी समजाचा द्वेष आहे का? असा सवालही केलाय.
उपोषणाचा आज चौथा दिवस
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं सांगितलं आहे. मात्र, सरकार ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लावणार नाही हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावं असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं आता लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
OBC Reservation Hunger strike: ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही, लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाची गरज नव्हती; बबनराव तायवाडेंनी फटकारलं