पालघर : नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात खासगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 45 जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुजरातमधील भाविक ट्रॅव्हल बसमधून शिर्डीहून डहाणूमधील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. दरम्यान बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बस जवळपास 25 फूट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी येऊन बचावकार्य सुरु केलं.
बसमध्ये 56 प्रवाशांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात 45 जखमी झाले असून त्यांची 10 ते 12 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.