एक्स्प्लोर

Pune Crime News : दोन लाख ईमेल आयडी अन् एक लाखाहून अधिक फोन नंबर; बनावट जॉब रॅकेटचा पर्दाफाश, चार आफ्रिकन नागरिकांना अटक

बनावट जॉब रॅकेट चालवल्याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन लाख ईमेल आयडी आणि एक लाखाहून अधिक मोबाइल फोन नंबर असल्याची माहिती आहे.

Pune Crime News : बनावट जॉब रॅकेट (cyber crime) चालवल्याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन लाख ई-मेल आयडी आणि एक लाखाहून अधिक मोबाईल फोन नंबर असल्याची माहिती आहे. ही माहिती पाहून मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या सगळ्या मोबाईल नंबर आणि मेलचा वापर नागरिकांना फसवणूक करण्यासाठी चार नागरिक करत होते. या रॅकेटमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. 

चार आरोपी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घानाचे नागरिक आहेत. हे सर्व विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही यातील किमान तीन विद्यार्थी येथेच थांबले होते. अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने एप्रिल ते जुलै दरम्यान  26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा मुंबईतील एका व्यक्तीने बीकेसी येथील सायबर सेलकडे केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी चार आरोपींना पुण्यातून अटक केली. आरोपीचे वय 22 ते 32 वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपींकडे दोन लाख ई-मेल आयडी, 1,04,000 लोकांचे मोबाईल फोन नंबर्सचा डेटाबेस असून त्याचा वापर करुन ते लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

17 चेकबुक, 115 सिमकार्ड जप्त
पोलिसांनी 13 मोबाईल फोन, चार लॅपटॉप, विविध देशांचे पासपोर्ट, तीन इंटरनेट राउटर, विविध बँकांचे 17 चेकबुक, 115 सिमकार्ड, 40 बनावट रबर स्टॅम्प आणि किमान सहा बँकांचे खाते तपशील जप्त केले. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 420 आणि 120 -बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 22 ते 32 वर्षाचे नागरिक
अटक करण्यात आलेले सगळे नागरिक  22 ते 32 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तू आणि मेल आयडी पाहून मुंबई सायबर सेलचे अधिकारीही अवाक् झाले आहेत. चारही विद्यार्थी अमेरिकेत नोकरी देण्याच्या बाहण्याने फसवणूक केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. 

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
शहरात अनेकांकडून अशा प्रकारचं रॅकेट चालवलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषांना बळू पडू नका किंवा कोणालाही पैसे पाठवण्याआधी संपूर्ण माहिती घ्या आणि काहीही संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget