एक्स्प्लोर
72 वर्षाच्या शास्त्रज्ञ बापाचा 3 दत्तक मुलींवर बलात्कार
नागपूर: नागपूरमध्ये 72 वर्षाच्या बापानं दत्तक घेतलेल्या 3 अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
72 वर्षाच्या या आरोपीनं बाप लेकीच्या नात्यालाच काळीमा फासला आहे. 16 वर्षांच्या मुलीबरोबर हा नराधम 8 वर्षांपासून दृष्कृत्य करत होता. अखेर नराधम बापाचा जाच असह्य झाल्यानं मुलीनं हा प्रकार मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी डॉ. मकसूद हसन अन्सारी हा निरी या प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आहे.
अन्सारीनं 11 आणि 6 वर्षांच्या मुलींवरही अत्याचार केले आहेत. आता तिन्ही मुली बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अन्सारीची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली आहे. त्यामुळं जीवे मारण्याची धमकी देऊन अन्सारीनं तिन्ही मुलींना सावज केलं. दत्तक घेतलेल्या मुलींबाबत योग्य कागदपत्रही पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळं संशय आणखी बळावला आहे. 60 वर्षावरील नागरिकाला दत्तक देत नाहीत. कशा आल्या, त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं दत्तक घेतलं असावं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement